उस्मानाबाद - लोकशाही टिकवण्यासाठी बॅलेट पेपरची मागणी होते आहे. ती मागणी मान्य व्हायला हवी. ईव्हीएम मशीन आळशी मतदारांसाठी आहे. ईव्हीएम मशीन कुणी बनवले ? माणसानेच ना..! ज्या प्रमाणे संगणक हॅक करता येवू शकते, मग ईव्हीएम का करता येणार नाही. असा उपरोधिक सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.
उदयनराजे भोसले यांनी तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी ते मंदीरसंस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत ते म्हणाले की, मुख्यमंत्री पद माझ्यासाठी गौण बाब आहे. राजकारणामुळे राजकारणी लोकांचे भले झाले, जनतेचे नाही. आजपर्यंत झाले गेले विसरुन आता यापुढे पदावर नीट बसावे. पदावर असतांना समाजहिताचे निर्णया घ्या, राजकारण करु नका. नाहीतर जनता यापुढे पदावर बसु देणार नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनाही लगावला
निवडणूक आयोगाचे मंदिर बांधावे लागेल-
तसेच ईव्हीएम मशीन बाबत बोलताना खा.भोसले म्हणाले, बटण दाबले की कुठे मत जातयं हे कळत नाही, अशी जनतेत चर्चा आहे. ज्याने ईव्हीएम बनविली त्याला त्यात बिघाड करायचेही हे माहीत असते, त्यामुळे तो मेक मारतोच. तुळजाभवानी प्रमाणे किंवा विठ्ठलाच्या मंदिराप्रमाणे आता निवडणूक अधिकाऱयांचे देखील मंदिर बांधावे, असेही ते म्हणाले.