ETV Bharat / state

कोरोना कक्षातून पॉझिटिव्ह रुग्णांनी काढला पळ; गुन्हा दाखल - कोरोना उपडेट्स उस्मानाबाद

जिल्ह्यातील उमरगा आणि कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डातून दोन पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेले, त्यामुळे या दोन्ही रुग्णांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांनी काढला पळ
पॉझिटिव्ह रुग्णांनी काढला पळ
author img

By

Published : Sep 7, 2020, 12:41 PM IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 983 पर्यंत जाऊन पोहोचली. तर, यातील 4 हजार 420 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ही समाधानाची बाब असली तरीही, कोरोना संदर्भातीललोकांच्या मनातील भीती कायम आहे. उमरगा आणि कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डातून दोन पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेले, त्यामुळे या दोन्ही रुग्णांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंब येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावरती उपजिल्हा रुग्णालयात कळंब येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान दुपारी हा रुग्ण कोणालाही काही न संगता निघून गेला. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात त्या रुग्णाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

तर, उमरगा तालुक्यातील माडज येथील एक महिलेवर देखील रुग्णालयातून पळून गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, उपचार सुरू असताना ती परस्पर निघून गेली. या दोन्ही रुग्णांनी कोविड प्रसाराची शक्यता निर्माण करण्याचे निष्काळजीपणाचे कृत्य केले. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद जाधव यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - सॅनिटायझरचा वापर भलत्याच कामासाठी, 'हे' वाचाल तर धक्का बसेल..!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.