ETV Bharat / state

पाणी पिण्याचे की नाल्याचे? मुळेवाडी ग्रामस्थांवर दुषीत पाणी पिण्याची वेळ - कोळीवाडी

दुषीत आणि गढूळ पाण्याचे सेवन केल्यामुळे गावातील २० टक्के लोकांना त्वचेचे आजार जडले आहे.

पुरवठा झालेले दुषित पाणी
author img

By

Published : May 17, 2019, 4:34 AM IST

Updated : May 17, 2019, 1:08 PM IST

उस्मानाबाद - शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळेवाडी या गावातील लोक सध्या भीषण समस्येला तोंड देत आहेत. शुद्ध पाण्याअभावी ग्रामस्थांवर आज काळेकुट्ट आणि गढूळ पाणी वापरण्याची वेळ आली आहे. परिणामी २० टक्के ग्रामस्थांना त्वचेचे आजार जडले आहेत.

पाण्याची समस्या मांडताना मुळेवाडीचे ग्रामस्थ

उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी खासदार आणि माजी पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या तेर गावापासून मुळेवाडी थोड्या अंतरावर आहे. १ हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील लोक वेगळ्याच कारणाने त्रस्त आहेत. या गावात पाण्याची कमतरता नाही. मात्र, विहिरींचे अधिग्रहण केले नसल्यामुळे तेरणा धरणातून येणारे अशुद्ध पाणी ग्रामस्थांना वापरावे लागत आहे. तसेच नळाद्वारे येणारे अशुद्ध पाण्याचे शुद्धीकरणही केले जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

कपडे, भांडी आणि आंघोळीसोबतच नाईलाजाने ग्रामस्थांना या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे. परिणामी अशा दुषीत आणि गढूळ पाण्याचे सेवन केल्यामुळे गावातील २० टक्के लोकांना त्वचेचे आजार जडले आहे. दुषीत पाण्याच्या सेवनामुळे ग्रामस्थांच्या अंगाला खाज येत असून शरीरावर गान्धी (चट्टे) उठत आहेत. मात्र, प्रशासन या समस्येकडे दुर्लेक्ष करत असल्याचे गावकरी सांगतात. त्यामुळे यांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Intro:मी पॉवर डायरेक्टर मध्ये एडिट केलेले pkg या सोबतच जोडत आहे योग्य असेल तर वापरा

पाणी पिण्याचे की नालीचे? कोळीवाडी ग्रामस्थांवर विषारी पाणी पिण्याची वेळ

उस्मानाबाद - शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर आणि तेरणा धरणापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळेवाडी या गावातील लोकांवरती आज काळेकुट्ट गढूळ पाणी वापरण्याची वेळ आलीय जिल्ह्याचे माजी खासदार आणि माजी पाटबंधारे मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या तेर या गावापासून जवळच असलेल्या गावातील लोकांना वर असले विषारी पाणी प्यावे लागतेय त्यामुळे चांगल्या पाण्यावाचून येथील ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत या मुळेवाडीत आजघडीला सरकारी किंवा खाजगी एकही टॅंकर नाही व विंधन विहीर आणि विहिरींचे अधिग्रहण केले नाही त्यामुळे तेरणा धरणातून येणारे हे अशुद्ध पाणी वापरावे लागते गावातील ग्रामस्थ सांगतात आमच्या गावाला पाण्याची कमतरता नाही मात्र अत्यंत दूषित असे पाणी आम्हाला प्यावे लागते या नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरणही केले जात नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे
या दूषित अशा पाण्यामुळे या गावातील लोकांना त्वचेचे आजार होत आहेत लोकांच्या अंगाला खाज येत असून शरीरावरती गान्धी ( चट्टे) उठताहेत हे दूषित असलेले पाणी या लोकांना अंघोळीसाठी,कपडे धुण्यासाठी, घरातील भांडी धुण्यासाठी त्याचबरोबर वेळप्रसंगी पिण्यासाठीही पाणी वापरावे लागत आहे या मूळेवाडीची लोकसंख्या जवळपास एक हजार आहे मात्र या गावातील 20 टक्के लोकांना असे त्वचेचे आजार जडत असल्याचे गावकरी सांगतात त्याच्यामुळे यांच्या पिण्याच्या पाण्या कडे कोण लक्ष देईल असा प्रश्न उपस्थित झाला आहे

Body:यात vis व byte पाठवतो आहे
आणि त्या सोबतच मी पॉवर डायरेक्टर मध्ये एडिट केलेलं व्हिडिओ pkg जोडत आहे योग्य वाटत असेल तर ते चालवायला हरकत नाही

Conclusion:कैलास चौधरी
इ.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : May 17, 2019, 1:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.