ETV Bharat / state

तुळजाभवानी मंदिर प्रशासन बोगस पासच्या आणखी एका घोटाळ्याने चर्चेत - तुळजाभवानी मंदिर बोगस पास प्रकरण

वापरलेल्या पासच्या प्रति झेरॉक्स काढून पुन्हा भाविकांना दिल्या जातात. यामध्ये मोठा आर्थिक गैर व्यवहार झाल्याचे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. महसूल प्रशासनाने मात्र हा आरोप फेटाळला आहे...

उस्मानाबाद
उस्मानाबाद
author img

By

Published : Dec 16, 2020, 8:42 PM IST

उस्मानाबाद - तुळजाभवानी मंदिर प्रशासन म्हटले की, नेहमी वेगवेगळ्या घोटाळ्यांनी चर्चेत असणारे धार्मिक क्षेत्र, अशी ओळख निर्माण झाली आहे. आता तुळजाभवानी मंदिर प्रशासन बोगस पासच्या आणखी एका घोटाळ्याने चर्चेत आले आहे.

उस्मानाबाद

तुळजाभवानी मंदिरात ऑनलाइन दर्शन पास (प्रवेश पास)मध्ये घोटाळा घालून दर्शन दिले जात असल्याचा आरोप पुजारी मंडळाने केला आहे. तर या प्रकरणाला पुजारीच जबाबदार असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत असून दोषी पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश बंदी करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. कोरोना विषाणूच्या सावटाखाली तब्बल 8 महिन्यांनी तुळजाभवानीचे द्वार भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. अनेक आंदोलनानंतर दिवाळी पाडव्याच्या महूर्तावर काही अटी-शर्ती घालून हे द्वार भक्तांसाठी खुले केले आहे. ऑनलाइन दर्शन पास घेऊन दर्शन देण्याची सोय प्रशासनाने केली. या ऑनलाइन प्रवेश पासमध्येच घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप पुजारी मंडळाने केला आहे.

प्रवेश घोटाळ्यासाठी काही पुजारीच जबाबदार

वापरलेल्या पासच्या प्रति झेरॉक्स काढून पुन्हा भाविकांना दिल्या जातात. यामध्ये मोठा आर्थिक गैर व्यवहार झाल्याचे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. महसूल प्रशासनाने मात्र हा आरोप फेटाळला आहे. मंदिर प्रवेश घोटाळ्यासाठी काही पुजारीच जबाबदार आहेत. मंदिर प्रवेश पासमध्ये काही पुजारीच दोषी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच दोषी पुजाऱ्यांना नोटीसा दिल्या असून या पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश बंदी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविक हजारो किलोमीटर अंतर कापून मोठ्या श्रद्धेने येतात. मात्र, या दर्शन पासच्या घोळाने भाविकांच्या श्रद्धेवरच घाला घातला जात आहे. या दर्शन रांगेवर भाविक नाराज असल्याचे चित्र आहे. तासन्-तास रांगेत उभा राहून पास घेतल्यानंतरच दर्शन रांगेसाठी देखील तेवढाच वेळ लागत असल्याचे मत भाविकांनी व्यक्त केले. त्यामुळे प्रशासनाने या पद्धतीत बदल करायला हवे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.