उस्मानाबाद- कोरोना व्हायरस संसर्ग होऊ नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. तशा सूचनाही वारंवार केल्या जातात. संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरण्यासाठी आवर्जून सांगितले जात आहे. तर सॅनीटायझर वापरा हात स्वच्छ धुवा, असं वारंवार सांगितले जाते आहे. मात्र तुम्ही वापरलेल्या मास्कची नेमकी काय काळजी घेता आणि त्याची विल्हेवाट कशी लावतात असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.
वापरलेल्या मास्कची विल्हेवाटही योग्य रीतीने लावणे गरजेचे आहे. साधारणपणे आपण ऐक वेळी मास्क वापरले की, ते फेकून देतो. मात्र असे केल्याने संसर्गचा धोका कमी होण्यापेक्षा जास्त असल्याचे मत मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया संघटनेचे अध्यक्ष डॉ.ए.एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे. वापरलेले मास्क फेकून देण्यापेक्षा त्याला स्वच्छ गरम पाण्यात वीस मिनिटे ठेवून त्यानंतर धुऊन मग ते फेकून द्यावे किंवा वापरलेले मास्क जाळून किंवा जमिनीत खड्डा करून पुरून टाकावे. असे केल्यानेच हा संसर्गाचा धोका टळू शकतो.
तो मास्क वापरणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक वाढल आहे प्रत्येक घरी साधारणपणे एक तरी व्यक्ती मास्क वापरत आहे. हे मास्क वापरत असताना आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, याची माहिती सर्वश्रुत नाही. त्यामुळे साधारणपणे आपण एखाद्यावेळेस मास्क वापरलं तर ते फेकून देतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्गचा धोका अधिक आहे त्यामुळे मास्कची विल्हेवाट लावताना योग्य ती काळजी घ्यायला हवी.