ETV Bharat / state

कळंब शहरात मध्यरात्री तीन धाडसी चोरीच्या घटना; गॅस कटरने एटीएम फोडून लाखो रुपये पळवले

author img

By

Published : Feb 22, 2022, 1:34 PM IST

उस्मानाबाद जिल्ह्यात मागच्या काही महिन्यांपासून धाडसी दरोड्यासह चोरीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या दरम्यान शहरातील ढोकी रोड परिसरातील बँक ऑफ इंडिया आणि हिताची कंपनीचे दोन एटीएम मशीन चोरट्यानी गॅस कटरच्या साहायाने कापून पैसे घेऊन पसार झाले आहेत. विशेष म्हणजे हा सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.

धाडसी चोरीच्या घटना
धाडसी चोरीच्या घटना

उस्मानाबाद - कळंब शहरात मंगळवारच्या मध्यरात्री तीन चोरीच्या घटना घडल्या आहेत. दोन एटीएम मशीन गॅस कटरच्या साहायाने फोडून अंदाजे 21 लाख रुपये चोरल्याची घटना घडली आहे. तर एका कारखान्यातून गॅस कटर चोरल्याची घटना घडली आहे. एका रात्रीतून दोन एटीएम फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत.

कळंब शहरात मध्यरात्री तीन धाडसी चोरीच्या घटना

उस्मानाबाद जिल्ह्यात मागच्या काही महिन्यांपासून धाडसी दरोड्यासह चोरीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या दरम्यान शहरातील ढोकी रोड परिसरातील बँक ऑफ इंडिया आणि हिताची कंपनीचे दोन एटीएम मशीन चोरट्यानी गॅस कटरच्या साहायाने कापून पैसे घेऊन पसार झाले आहेत. विशेष म्हणजे हा सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. अशात पोलिसांची गस्त सुरू असताना देखील चोरांनी ही धाडसी चोरी केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी रात्री 2 वाजून 28 मिनिटाच्या सुमारास दोन चोरांनी ढोकी नाका परिसरातील हिताची कंपनीच्या एटीएममध्ये सेटर उघडून प्रवेश केला. आत आल्यानंतर त्यांनी सेटर लावून घेतला. त्यानंतर त्यांनी आपल्याकडील असलेल्या गॅस कटरने मशीनच्या पैसे असलेला भाग कापून काढला व त्यातून तब्बल साडे तीन लाख रुपये काढून पसार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

एटीएम फोडून लाखो रुपये पळवले

दरम्यान ढोकी रोडच्याच परिसरात असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये काही चोरांनी प्रवेश केला आणि हिताचीच्या एटीएमप्रमाणे ही देखील मशीन गॅस कटरने कापून अंदाजे 18 लाख रुपये घेऊन पसार झाल्याची माहिती मिळतेय. तर 3 वाजून 14 मिनिटाला शहरातील परळी रोडवरील नरसिंह ट्रेलर्समधून गॅस कटर चोरीला गेल्याची देखील घटना घडली आहे. हा देखील प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून सदरील चोरी झाल्याने चोरांना आता पोलिसांचाही धाक राहिला नाही का? असा प्रश्न या चोरीनंतर उपस्थित होत आहे.

घटनास्थळी पोलीस दाखल -

पहाटे परिसरातील आजूबाजूला असणाऱ्या दुकानदारांना एटीएम फोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना संपर्क केला. उपविभागीय पोलीस अधिकारी एम. रमेश, कळंब पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. तिन्ही घटनेची सविस्तर तक्रार घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राप्त झालेल्या सीसीटीव्हीचे फुटेज, हाताचे ठसे व इतर पुराव्याच्या आधारे आम्ही योग्य तपास करू, असं पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.