ETV Bharat / state

भरधाव टिप्पर पत्र्याच्या घरात घुसला.. पती-पत्नीचा चिरडून जागीच मृत्यू

पुणे-लातूर मागार्वरील ढोकी येथे चालकाचे नियंत्रण सुटलेला एक भरधाव टिप्पर घरात घुसल्याने अपघात घडून आला. यामध्ये घरात झोपलेले पती-पत्नी टिप्परखाली चिरडून जागीत मृत्युमुखी पडले आहेत. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे.

osmanabad accident two died
भरधाव टिप्पर पत्र्याच्या घरात घुसला
author img

By

Published : Nov 11, 2020, 4:03 PM IST

Updated : Nov 11, 2020, 4:26 PM IST

उस्मानाबाद- पुणे-लातूर मागार्वरील ढोकी येथे चालकाचे नियंत्रण सुटलेला एक भरधाव टिप्पर मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या घरात टिप्पर घुसून पलटी पती-पत्नी जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ढोकी गावात मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमींना उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रकाश बाबुराव सुरवसे (५५) व मजुरूकाबाई प्रकाश सुरवसे (५०), असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. तर गणपत प्रकाश सुरवसे यांच्यासह आकाश गणपत सुरवसे व अक्षरा प्रल्हाद सुरवसे ही लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत.

भरधाव टिप्पर पत्र्याच्या घरात घुसला

दिवाळीच्या तोंडावर गावावर शोककळा -

ऐन दिवाळीच्या तोंडावर भीषण अपघात झाल्याने ढोकी गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ढोकी येथील घटनास्थळास भेट देवून दुर्घटनेची माहिती घेतली तसेच रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली.

सुरवसे कुटुंब हे दुकानातच राहत होते. त्यांचे दुकान लातूर-पुणे रस्त्यालगत आहे. दरम्यान, मध्यरात्री ११ वाजेनंतर एक रिकामा टिप्पर लातूरच्या दिशेने निघाला होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते अनियंत्रित होऊन दुकानात शिरला.

Last Updated : Nov 11, 2020, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.