उस्मानाबाद - तुळजा भवानी मंदिर संस्थानने आणि तुळजापूर नगर परिषदेने अकरा कोटी रुपये खर्च करुन तुळजा भवानीची मुर्ती उभी करण्यापेक्षा तुळजा भवानीच्या भक्तांसाठी आणि पंचक्रोषीतील जनतेसाठी सुसज्ज असे मल्टी स्पेशालिस्टी रुग्णालय उभे करावे, अशी मागणी तुळजा भवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे व अॅड. शिरीष कुलकर्णी यांनी मंदिर संस्थान अध्यक्ष यांच्याकडे निवेनाद्वारे केली आहे.
साधारण वर्षभरापूर्वी ठराव घेऊन मंदिरा भोवती असलेल्या घाटशीळ भागात भव्य अशी तुळजाभवानीची मूर्ती उभा करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला होता. तुळजापुरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांना तुळजाभवानीचे दर्शन मिळतेच असे नाही, त्यामुळे प्रत्येकांना बाहेरूनच तुळजाभवानीचे दर्शन घेता यावे, या उद्देशाने हा निर्णय घेतला होता. मात्र आता या निर्णयाला पुजाऱ्यांनी विरोध केला आहे.
तुळजाभवानी मंदीर संस्थानकडे दीडशे कोटी रुपये पडून असल्याने आपण सकारात्मकपणे विचार करून याच पैशातून मल्टी स्पेशालिटी रूग्णालय उभा करावे व भक्तांच्या पैशाचा वापर भक्त व जनकल्याणासाठी व्हावा, अशी मागणी पुजाऱ्यांनी निवेदाद्वारे केली आहे.
हेही वाचा - 'भारत माता की जय' च्या घोषणा देत वामन पवार यांना अखेरचा निरोप
हेही वाचा - राहुल गांधींच्या अटकेचे पडसाद उस्मानाबादेत, पंतप्रधान मोदींसह योगी आदित्यनाथांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन