उस्मानाबाद - पती आणि नणंदेच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलिसानेच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार परंडा पोलीस ठाण्यात घडला. परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद याने तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या महिलेला लाथा बुक्याने मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत न्याय देण्याची मागणी या महिलेने केली आहे.
पीडित महिला तिच्या कुटुंबियांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेली होती. कोऱ्या कागदावर या महिलेची तक्रार घेण्यात आली मात्र, एफआयआरची कॉपी दिली नाही. त्यामुळे या महिलेने एफआयआरची मागणी केली. त्यावेळी महिलेची मागणी ऐकून न घेता, तू पोलीस ठाण्याच्या बाहेर जा असे सांगत लाथा-बुक्याने मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने पोलीस निरिक्षकावर केला आहे.
हेही वाचा - कोरोना : निर्यात ठप्प झाल्याने दररोज १५ हजार क्विंटल केळी पडून
या प्रकरणी महिलेने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे. पोलीस अधिक्षक या पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.