उस्मानाबाद - जिल्हात नव्याने सहा रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. उस्मानाबाद शहर आणि तुळजापूर शहर या नगरपालिका क्षेत्रात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. तुळजापूर आणि उस्मानाबाद शहरात सापडलेले दोन कोरोनाबाधित रुग्ण हे गंभीर स्थितीत आहेत. हे दोन्ही रुग्ण बाहेरच्या जिल्ह्यातून उस्मानाबाद येथे दाखल झाले आहेत.
या बाधित रुग्णांमुळे इतरांना संसर्ग होऊ नये, म्हणून उस्मानाबाद शहरात साठे चौक, मदिना चौकासह वेगवेगळ्या भागांमध्ये बाहेर फिरणाऱ्या लोकांवरती चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना 31 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी घेतला आहे.