उस्मानाबाद - येणाऱ्या काही दिवसांमध्ये रामजन्मभूमी व बाबरी मस्जिद या संवेदनशील विषयावर सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल येणार आहे. या निकालाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी आज पोलीस अधिक्षक रोशन यांनी शांतता बैठकीचे आयोजन केले होते.
न्यायालयीन निर्णय हे भावनिक, राजकीय किंवा धार्मिक नसुन ते निःपक्षपाती, वस्तुस्थिती, उपलब्ध पुराव्याला अनुसरून असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्व नागरिकांनी पाळणे बंधनकारक आहे. हा निकाल काहीही असो, निकालानंतर चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया व्हाट्सअप, फेसबुक अथवा इतर सोशल मीडिया, पत्रकबाजी टीकाटिपणी देऊ नयेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केले.
न्यायालयाचा अवमान करणे हा गुन्हा आहे. धार्मिक भावना दुखावेल असे वर्तन करणाऱ्या व न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या बैठकीत पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी सांगितले.