ETV Bharat / state

अहो ऐकलंत का..? उस्मानाबादेत पार पडले 'गंगा' गाईचे डोहाळे जेवण - उस्मानाबादमध्ये गाईचे डोहाळेजेवण news

'भड' कुटुंबाने आपल्या लाडक्या 'गंगा' नावाच्या गाईसाठी या खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते...भड कुटुंबीयांकडे तीन वर्षांची गंगा नावाची गाय आहे... ही गंगा पहिल्यांदाच माता होणार असल्याने, आपल्या लाडक्या गाईचे डोहाळे जेवण करायचे, असे या कुटुंबीयांनी ठरवले... मग सुरू झाली ती डोहाळेजेवणाची लगबग...

उस्मानाबादमध्ये गंगा गायीचे डोहाळे जेवण
author img

By

Published : Aug 29, 2019, 3:32 PM IST

Updated : Aug 29, 2019, 4:26 PM IST

उस्मानाबाद - शहरात चक्क एका गाईचे डोहाळे जेवण करण्यात आले आहे. 'भड' कुटुंबीयांनी एखाद्या महिलेचे करावे तसे आपल्या लाडक्या गंगा नावाच्या गाईचे डोहाळे जेवण अगदी विधिवत केले. गंगेचा हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अगदी उत्साहात आणि आनंदात पार पडला.

उस्मानाबादमध्ये गंगा नावाच्या गायीचे डोहाळे जेवण करण्यात आले

उस्मानाबादमधील 'भड' कुटुंबाने आपल्या लाडक्या "गंगा" साठी या खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कुटुंबीयांकडे तीन वर्षांची गंगा नावाची एक गाय आहे. ही गंगा पहिल्यांदाच माता होणार असल्याने आपल्या गाईचे डोहाळे जेवण करायचे, असे या कुटुंबीयांनी ठरवले.

हेही वाचा... उस्मानाबादेत पाच दिवसापासून पावसाची रिपरिप सुरुच; शेतकऱ्यांना दिलासा

लाडक्या गंगाला कार्यक्रमापूर्वी स्वच्छ अंघोळ घालण्यात आली. झुल, हार फुले, फुगे यांनी तिला सजवण्यात आले. डोहाळजेवणाच्या निमित्ताने दारात खास मंडप आणि रांगोळीही काढण्यात आली होती. एखाद्या महिलेसाठी जे जे करतात ते सर्व या गाईसाठी करण्यात आले. सुहासिनी महिलांना बोलावून गंगाची ओटीही भरण्यात आली. गंगाच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गंगाच्या समोर बसून गाण्याचा छोटासा कार्यक्रमही घेण्यात आला.

हेही वाचा... उस्मानाबाद : चारा छावण्यांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

भारतात प्राण्यांवर विशेष प्रेम असल्याचे नेहमीच पहायला मिळते. त्यातही गायीला माता मानून तिला अधिकच जपले जाते. आता भड कुटुंबीयांच्या या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमानंतर इतर गायींचेही डोहाळे पुरवले जातील यात शंका नाही...

Intro:सर व्हिओ देऊन pkg करावे प्लिज

गंगाचे डोहाळजेवण विधिवत पार पडले...

उस्मानाबाद - शहरात चक्क एका गाईचे डोहाळजेवण करण्यात आले आहे 'भड' या कुटुंबाने या आगळावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते भड यांच्याकडे तीन वर्षांची गंगा नावाची गाय आहे. गंगा पहिल्यांदाच माता होणार आहे गंगाला सातवा महिना सुरू आहे आणि यामुळे या गंगाच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सवाष्ण महिलांना बोलावून या गंगाची ओटी भरण्यात आली या गंगाच्या पाठीवरती साडीचोळी टाकण्यात आली तसेच शेजारील इतर महिलांनाही कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते ओटी भरण्यासाठी पाच प्रकारची फळे आणण्यात आली होती ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गंगाच्या समोर बसूनच छोटासा गाण्याचाही कार्यक्रम घेण्यात आला गंगाला कार्यक्रमापूर्वी सकाळी स्वच्छ धुतले होते गंगाला सजवण्यासाठी झुले, हार-फुले, फुगे आणली होती कार्यक्रमाच्या वेळी हा सर्व पेहरावा गंगा घालण्यात आला होता कार्यक्रमानंतर शेजारीपाजारी लोकांना जेवणासाठी आमंत्रित केले होते या डोहाळजेवणाचा निमित्त जवळपास 45 लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती दारासमोर सडा-रांगोळी आणि मंडप टाकण्यात आला होताBody:यात लागणारे सर्व vis आहेत व byte आहेत

त्या byte ला नवे दिली आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Aug 29, 2019, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.