ETV Bharat / state

उस्मानाबाद नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शांततेत, साहित्य सम्मेलनासाठी दीड लाखांचा निधी मंजूर - ncp

विषय पत्रिकेतील ३२ विषय चर्चा करून मंजूर करण्यात आले. त्यापैकी शहरातील शाळांची असणारी दुरुस्ती सीएसआर फंडातून करण्यात येणार आहे. रक्कम कमी पडल्यास इतर निधी वापरून दुरुस्ती करण्यात येणार आहेत. मालमत्ता कराचे सर्वेक्षण करताना ज्यांची एजन्सीच्या चुकीने भोगवटादार अशी नोंद झाली आहे, अश्या नोंदी जुने रेकॉर्ड तपासून रद्द केल्या जाणार आहेत.

उस्मानाबाद नगरपालिका
author img

By

Published : Nov 21, 2019, 5:49 AM IST

उस्मानाबाद - सातत्याने गडबड गोंधळाची परंपरा असलेल्या उस्मानाबाद नगरपालिकेची सर्व साधारण सभा पहिल्यांदाच शांततेत पार पडली. नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत आहे. पण, नगराध्यक्ष शिवसेनेचा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात नेहमी खटके उडत असतात. पण, यावेळी हे चित्र बदलल्याने आश्चर्च व्यक्त केले जात आहे.

सभेमध्ये ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दीड लाख रुपयांचा निधी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. गटनेते युवराज नळे यांनी १० लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु शासन निर्णयानुसार दीड लाख देता येत असल्याने नगरपालिकेला तेवढीच मदत करता येणार आहे.

हेही वाचा - लाखो रुपये मंजूर होऊनही स्मशानभूमी नाही; काक्रंबा गावातील ग्रामस्थ संतापले

विषय पत्रिकेतील ३२ विषय चर्चा करून मंजूर करण्यात आले. त्यापैकी शहरातील शाळांची असणारी दुरुस्ती सीएसआर फंडातून करण्यात येणार आहे. रक्कम कमी पडल्यास इतर निधी वापरून दुरुस्ती करण्यात येणार आहेत. मालमत्ता कराचे सर्वेक्षण करताना ज्यांची एजन्सीच्या चुकीने भोगवटादार अशी नोंद झाली आहे, अश्या नोंदी जुने रेकॉर्ड तपासून रद्द केल्या जाणार आहेत.

हेही वाचा - आर्द्रता मिटरच्या माध्यमातून होतीय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची लूट

ही सभा राणा जगजितसिंह पाटील यांच्या भाजपा प्रवेशा नंतर पहिल्यांदाच घेण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अप्रत्यक्ष भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच ही सर्वसाधारण सभा शांततेत पार पडल्याचे बोलले जात आहे.

Intro:दोन वर्षात पहिल्यांदाच नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शांततेत

उस्मानाबाद - उस्मानाबाद नगरपालिकेत शिवसेनेचे नगराध्यक्ष आहेत तर सर्वात ज्यास्त सदस्य संख्या ही राष्ट्रवादीची आहे त्यामुळे येथे सेना व राष्ट्रवादीमध्ये सारखा गोंधळ निर्माण होत होता तर राष्ट्रवादी च्या खालोखाल सेनेचे सदस्य व 7 नगरसेवक हे भाजपचे आहेत त्यामुळे होणाऱ्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी एकटी पडायची व इतर पक्ष एकत्र येऊन सभा पार पडायची मात्र आजच्या सभेत वेगळं चित्र पाहायला मिळालं उस्मानाबाद नगरपालिकेची सर्वसाधारण सभा एकदम शांततेत व आनंदात पार पडली. सभेमध्ये ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दीड लाख रुपयाचा निधी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. गटनेते युवराज नळे यांनी १० लाख रुपयाची मागणी केली होती परंतु शासन निर्णयानुसार दीड लाख देता येत असल्याने नगरपालिकेला तेवढीच मदत करता येणार आहे.
विषय पत्रिकेतील ३२ विषय चर्चा करून मंजूर करण्यात आले. त्यापैकी शहरातील शाळांची असणारी दुरुस्ती सीएसआर फंडातून करण्यात येणार आहे रक्कम कमी पडल्यास इतर निधी वापरून या दुरुस्ती करण्यात येणार आहेत. मालमत्ता कराचे सर्वेक्षण करताना ज्यांची एजन्सीच्या चुकीने भोगवटादार अशी नोंद झाली आहे अश्या नोंदी जुने रेकॉर्ड तपासून रद्द केल्या जाणार आहेत. असे वेगवेगळे विषय मांडण्यात आले ही सभा राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजपा प्रवेशा नंतर पहिल्यांदाच घेण्यात आली त्यामुळे राष्ट्रवादी च्या नगरसेवकांनी अप्रत्यक्ष भाजपात प्रवेश केला असल्याचे बोलले जाते आणि यामुळेच ही सर्वसाधारण सभा शांततेत पार पडल्याचे बोलले जात आहेBody:यात vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.