उस्मानाबाद - शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला झाल्याची घटना घडली. यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती मिळते आहे. कळंब तालुक्यातील पाडोळी येथे ही घटना घडली.
हेही वाचा - उस्मानाबादेत शिवसेनेने राखला गड; ओमराजे निंबाळकरांची बाजी
हेही वाचा - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टवादी युतीनं महाराष्ट्राचं नुकसान झालं - मोदी
ओमराजे निंबाळकर हे उस्मानाबाद लोकसभेचे शिवसेनेचे खासदार आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर महायुतीचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ पाडोळी येथे आले होते. यावेळी गावातून प्रचार करत असताना हा प्रकार घडला. यामध्ये निंबाळकरांच्या हातावर, मनगटावर चाकूचे वार झाले. त्यानंतर हल्लेखोर हा फरार झाला आहे. मात्र, हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. यासंदर्भात ओमराजे निंबाळकर पत्रकार परीषद घेऊन बोलणार आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह यांच्यात लढत झाली होती. यामध्ये ओमराजेंनी राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता.