उस्मानाबाद - तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर झाल्यानंतर या संदर्भातला पहिलाच गुन्हा शहरातील आनंद नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबाद शहरातील एका डॉक्टरने आपल्या पत्नीला व्हाट्सअॅपवर मेसेज पाठवून तलाक दिला होता. त्या प्रकरणी पीडितेने तक्रार दाखल केली आहे.
या डॉक्टरचे नाव शफी मकसुद मुजावर, असे असून याने 6 जानेवारी 2019 रोजी 3 वाजून 24 मिनीटांनी पत्नीला व्हाट्सपद्वारे तीन वेळा बेकायदेशीर तलाक दिला आणि शिवीगाळ केली. महिलेल्या आलेल्या व्हाट्सअॅप मॅसेजमध्ये “मेरी तरफ से तुम्हे तलाक! तलाक ! तलाक !” असा मजकूर लिहिला होता.
याबाबत डॉ. शफी मुजावर याच्या पत्नीने आनंद नगर पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. तर, पत्नीच्या तक्रारीनुसार डॉ. शफी मुजावर यांच्याविरुध्द मुस्लीम महिला विवाहावरील हक्कांचे संरक्षण अधिनीयमन 2019 कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.