उस्मानाबाद - जिल्ह्यातील परांडा मतदारसंघातील युतीचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत हे 205 कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल मोटे यांच्याकडे 24 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
हेही वाचा - तुळजाभवानीची महिषासूर मर्दिनी रुपात अलंकार महापूजा
तानाजी सावंतांची माहिती -
सावंतांकडे 127 कोटी 15 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर पत्नी शुभांगी यांच्या नावाने 31 लाख रुपये इतकी संपत्ती आहे. सावंतांचे चिरंजीव गिरीराज सावंत यांच्या नावे 4 कोटी 33 लाख रुपये व दुसऱ्या मुलाकडे ऋषीराज यांच्या नावाने 4 कोटी 10 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. डॉ. सावंत कुटुंबाकडे शेती, घर यांसारखी 69 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. अशा प्रकारे जवळपास 205 कोटी रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता सावंतांकडे आहे.
डॉ. सावंत यांच्यावर विविध बँकांचे जवळपास 25 कोटी रुपयांचे कर्ज आहे. गेल्या 5 वर्षांत त्यांच्या उत्पन्नात जवळपास 3 पटीने वाढ झाली आहे. सावंत यांच्या नावाने 1 कोटी रुपयांचे मूल्य असलेल्या 8 गाड्या असून पती पत्नीसह कुटुंबाकडे एकत्रित 1 किलो सोने चांदीचे दागिने आहेत.
उत्पन्नाचे साधन -
तानाजी सावंत यांचे उत्पन्नाचे साधन उद्योग, गुंतवणूक, पगार आणि शेती आहे.
हेही वाचा - ..तर शिवसेनेला जशास तसे उत्तर देऊ; उस्मानाबादेत भाजपाध्यक्षाचा इशारा