उस्मानाबादकरांसाठी दिलासादायक बातमी, जिल्ह्यातील 41 रुग्ण कोरोनामुक्त - उस्मानाबादमधील कोरोनामुक्तांची संख्या
उस्मानाबादमधील 88 कोरोना रुग्णांपैकी 41 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या 47 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत 6 हजार 613 जणांना क्वरंटाईन करण्यात आले आहे.
उस्मानाबाद - कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या जिल्ह्यासाठी डोकेदुखी ठरत होती. जिल्ह्यात आत्तापर्यंत 88 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे, ग्रीन झोनमध्ये असलेला जिल्हा बघता बघता रेड झोनमध्ये गेला. अशात नागरिकांची धडधड वाढली असतानाच दिलासादायक बाब समोर आली आहे. उस्मानाबादमधील 88 कोरोना रुग्णांपैकी 41 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
सध्या 47 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत 6 हजार 613 जणांना क्वरंटाईन करण्यात आले आहे. सोबतच 1 हजार 116 लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा जरी मोठा असला तरी विषाणूवर मात केलेल्या रुग्णांची संख्याही समाधानकारक आहे. त्यामुळे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे.