उस्मानाबाद - जिल्ह्यातील कळंब तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. तसा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महिलेसोबत देखील झटापट झालेली पाहायला मिळत आहे. याप्रकरणी बालाजी शेळके यांच्या तक्रारीवरून कळंब पोलिसात शिवाजी शेंडगे आणि बबलू चोंदे यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीत काय?
बालाजी शेळके यांनी दिलेली तक्रार अशी की, शेळके आणि गावातील एक महिला दिनांक 1 सप्टेंबरला सांयकांळी 6 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोटार सायकलवरुन जात होते. दोघे शिवाजी पुतळा कळंब येथे आलो असता त्यावेळी शिवाजी शेंडगे आणि बबलु चोंदे हे तेथे आले. त्यानी तुमची जमीन विकु देणार नाही, असे कारण काढुन दोघास लाथाबुक्क्यांनी पोटावर व छातीवर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
बबलू चोंदे आणि शिवाजी शेंडगे यांनी बालाजी याला सदर जमिनीत पडु नको नाहीतर तुला जिवे मारुन टाकु, अशी धमकी दिली. त्यामुळे पोलीस ठाणे कळंब येथे दोघांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेले. पोलिसांनी एम. एल. सी. पत्रक देऊन उपचार कामी सरकारी दवाखाना कळंब येथे पाठवले असता बालाजी याला सुहास काटे याचा फोन आला. यावेळी लाकडी अड्डा बाजार मैदानचे जवळ ये, असे त्याला फोनवर सांगण्यात आले.
त्यावेळी मी तेथे गलो असता त्याठिकाणी मला शिवाजी व बबलु या दोघांनी मिळून हातातील लाकडाने माझे डोक्यात व उजव्या हातावर मारले. तसेच उजव्या डोळ्याजवळ मुक्कामार मारुन गंभीर जखमी केले. त्यांनी माझ्या डोक्यात मारल्यामुळे माझ्या डोक्यातुन रक्त निघु लागले, अशी तक्रार बालाजी शेळके यांनी कळंब पोलिसांत दिली. या तक्रारीवरून कळंब पोलिसांत नमूद दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा - पुण्यात महिला सरपंचाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल
दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. दोघांना कळंब न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.