ETV Bharat / state

Osmanabad News : कुत्र्याने मटन खाल्ल्याच्या कारणावरून बापाकडून मुलीचा खून - Daughter killed by father

कुत्र्याने मटन खाल्ल्याच्या कारणावरून बापानेच मुलीचा खून केल्याची घटना घडल्याने तुळजापूर तालुक्यात खळबळ उडाली, सदरील घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ( Daughter killed by father )

Osmanabad News
उस्मानाबाद
author img

By

Published : Sep 20, 2022, 5:29 PM IST

उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील कार्ला ग्रामस्थ गणेश झंपण भोसले व मिराबाई गणेश भोसले या दोघा पती-पत्नींनी दि. 18 सप्टेंबर रोजी 5 वा. कार्ला येथे त्यांची मुलगी काजल मनोज शिंदे, वय 22 वर्षे हिस कुत्र्याने मटन खाल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन पिता गणेश भोसले यांनी काजलवर रिव्हाल्वर मधून गोळी झाडून तीला गंभीर जखमी केले. ( Daughter killed by father )

यावेळी काजल हिचे नातेवाईक : विशाल जयराम भोसले यांनी काजल हिस जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे घेउन जात असताना काजल ही मृत झाली. तसेच गणेश भोसले व मिराबाई भोसले या दोघांनी मनोज सुनिल शिंदे, राहणार कार्ला यांसही ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मनोज सुनिल शिंदे यांनी दि. 19 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 504, 506, 34 अंतर्गत नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्याच्या घटनास्थळी तुळजापूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक श्रीमती सई भोरे-पाटील यांसह नळदुर्ग पो.ठा.चे सपोनि श्री. सिध्देश्वर गोरे यांनी भेट दिली असून गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि सिध्देश्वर गोरे हे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.