उस्मानाबाद - सध्या जगभर कोरोना व्हायरसने मोठा धुमाकूळ घटल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हायरसच्या धोक्यामुळे भारतातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच उस्मानाबाद शहरात 'हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहे' यांच्या 715 वर्षानिमित्त भरवण्यात येणाऱ्या उरुसातील अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
हेही वाचा... 'कोरोना' प्रतिबंधासाठी विदेशात वापरलेल्या ‘त्या’ मास्क विक्रीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश
केंद्र आणि राज्य शासनाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनेक पाऊले उचलली आहेत. त्याचा एक भाग म्हणून मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येण्याच्या कार्यक्रमावर निर्बंध लावण्यात येत आहेत. त्यानुसार हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहे यांच्या उरुसातील विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रशासन व उरूस कमिटीच्या संयुक्त बैठकीत यावर चर्चा करुन निर्णय घेण्यात आला.
प्रशासन व वक्फ बोर्डाचे अधिकाऱ्यांनी पारंपारिक धार्मिक विधी वगळता इतर मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. चीन या देशात सुरू झालेला कोरोना आजाराचे संशयित रुग्ण भारतातही आढळत आहेत. शासनयंत्रणा त्यामुळे सावध झाली असून या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या निमित्ताने नागरिक एकत्रित येतात, अशा कार्यक्रमांवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा... दिल्लीमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण ३३७ लोकांच्या संपर्कात; सर्वजण रुग्णालयात दाखल