उस्मानाबाद - सध्या मराठवाड्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी भविष्यात जनावरांची चारा टंचाई भासू नये म्हणून चारा साठवणूक केली. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील नायगाव येथील विश्वनाथ मस्के यांच्या शेतातील दोन हजार कडबा अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना घडली आहे. आता जनावरांना चारा कुठून आणायचा, हा प्रश्न विश्वनाथ मस्के यांच्यासमोर आहे.
एक महिन्यापूर्वी याच शेतकऱ्याच्या शेतातील पाच एकर ठिबक सिंचनचा संच अज्ञात व्यक्तीने पेटवला होता. याबाबतीत शिराढोण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत कडबा जाळल्याने शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा -
दिल्ली हिंसाचार: मृतांचा आकडा ४२ वर, काँग्रेस प्रतिनिधींची हिंसाचारग्रस्त भागाला भेट
ओबीसींची जातनिहाय जनगणना अशक्य, केंद्राने फेटाळला राज्याचा प्रस्ताव