उस्मानाबाद - शहरातील अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम लवकर पूर्ण करावे, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ही मागणी गेल्या काही वर्षांपासून असून अद्यापही पूर्ण झाली नाही. यामुळे हे आंदोलन करत असल्याचे भाजप युवती मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पूजा देडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
उस्मानाबाद नगर परिषद यांनी मातंग समाजाला दिलेल्या एक एकर जागेचे सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपये देण्यात यावे. येथेच 500 चौरस फुट जागेमध्ये सुसज्ज असे अण्णाभाऊ साठे यांचे नवे ग्रंथालय स्थापन करावे. मातंग समाजाच्या विविध सामाजिक कार्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देऊन यातून मंगल कार्यालय अथवा सभा मंडप बांधण्यात यावे. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला किमान 21 फूट उंच असावा त्याचबरोबर या पूर्णाकृती पुतळ्याचे काम त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त याच वर्षी तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे त्या निवेदनात उल्लेख आहे.
हेही वाचा - पालकमंत्री शंकर गडाख यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ