उस्मानाबाद - फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून उस्मानाबाद जिल्हाधकारी कार्यालयासमोर सीएए आणि एनआरसीच्या विरोधात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत कायदा रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषणकर्ते सांगत आहेत. आंदोलनकर्त्यांनी कफन परिधान करत आज आंदोलन केले.
याच साखळी उपोषणात आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलने केले आहे. आंदोलनकर्त्यांनी आंदोलनात कफन परिधान करत आंदोलन केले. मुस्लीम समाजात कफनला पवित्र मानले जाते. या समाजात एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्या व्यक्तीला कफन परिधान केले जाते. मात्र, आज झालेल्या आंदोलनात आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांनी तशाच पद्धतीने प्रतिकात्मक कफन घालून आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर या आंदोलनात लहान मुलांनी देखील सहभाग घेतला होता. सरकार जोपर्यंत सीएए आणि एनआरसी कायदा रद्द घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - अजित पवारांचे सोयरेच म्हणतात.. महाविकास आघाडी सरकार विश्वासघातकी