ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये कंटेनर-एसटीचा अपघात; 18 जखमी, 3 गंभीर - कणकवली-लातूर अपघात

कणकवलीहून लातूरकडे निघालेल्या बस आणि कंटेनरमध्ये अपघात झाला. यात 18 जण जखमी झाले आहेत.

bus accident
कंटेनर व एसटी बसचा अपघातामध्ये चालकासह अन्य तिघे गंभीर जखमी
author img

By

Published : Mar 11, 2020, 9:14 PM IST

उस्मानाबाद - तडवळे ते दुधगाव या गावादरम्यान कंटेनर आणि एसटी बसचा अपघात झाला. यात 18 जण जखमी झाले असून बस चालकासह अन्य दोन गंभीर जखमी आहेत. कणकवली आगाराची बस (एमएच 20 बीएल- 4082) लातूरवरून कणकवलीकडे निघाली होती. तडवळे येथील बसस्थानकावरून थांबा घेऊन साधारपणे दोन किलोमीटर पुढे गेल्यावर पुणे येथून हैदराबादकडे फ्रीज घेऊन जात असलेला कंटेनर (एमएच 02 क्यू 7908) समोरुन आला असताना त्यांच्यात अपघात झाला.

कंटेनर व एसटी बसचा अपघातामध्ये चालकासह अन्य तिघे गंभीर जखमी

हेही वाचा - दिल्ली हिंसाचार: ताहिर हुसेनच्या तीन सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक

बसच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा होऊन बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे दहा फुट खड्डयात अर्धवट अडकली. या बसमध्ये 30 प्रवासी होते. यापैकी 17 प्रवासी जखमी झाले. तर बसचालकासह अन्य तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमीपैकी काहींना येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि काहींना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.