ETV Bharat / state

साहित्याची भूक भागवण्यासाठी पायी, सायकलसह विमानाने केला 'या' व्यक्तीने प्रवास

साहित्याची भूक भागवण्यासाठी कोण कुठला प्रयोग अवलंबवेल हे काहीच सांगता येत नाही. फुलचंद नागटिळक हे असे अवलिया आहेत की ज्यांनी २७ साहित्यसंमेलन पाहिले आहेत. काही वेळेला पायी चालत जाऊन, सायकलने जाऊन, माल वाहतूक ट्रक तर कधी विमानात जाऊनही त्यांनी साहित्य संमेलनाला हजेरी लावली आहे. हे नागटिळक यांनी फक्त साहित्याची भूक भागवण्यासाठी केले.

osmanabad
फुलचंद नागटिळक
author img

By

Published : Jan 11, 2020, 11:11 PM IST

उस्मानाबाद - साहित्याची भूक भागवण्यासाठी कोण कुठला प्रयोग अवलंबवेल हे काहीच सांगता येत नाही. फुलचंद नागटिळक हे असे अवलिया आहेत की ज्यांनी सत्तावीस साहित्यसंमेलन पाहिले आहेत. काही वेळेला पायी चालत जाऊन, सायकल ने जाऊन, माल वाहतूक ट्रक तर कधी विमानात जाऊनही त्यांनी साहित्य संमेलनाला हजेरी लावली आहे. हे नागटिळक यांनी फक्त साहित्याची भूक भागवण्यासाठी केले. त्यांच्याशी चर्चा केली 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी कैलास चौधरी यांनी.

फुलचंद नागटिळक यांच्याशी चर्चा करताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी कैलास चोधरी

नागटिळक यांनी सुरुवातीला कोल्हापूर येथे १९९२ साली झालेल्या साहित्य संमेलनाला हजेरी लावली. त्यानंतरचे प्रत्येक साहित्य संमेलनात फुलचंद नागटिळक यांनी सहभाग घेतला. कोल्हापूर, सातारा, घुमान, परभणी, आळंदी, अहमदनगर आणि पणजी येथील साहित्य संमेलनात देखील ते सहभागी झाले होते. पणजीतील साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी नागटिळक यांनी चक्क माढा तालुक्यातील त्यांच्या खैरगाव गावापासून पणजीपर्यंत पायी प्रवास केला होता. तर, परभणी येथे झालेल्या साहित्य संमेलनाला ते सायकलने गेले होते. इतकेच नव्हे तर अंदमान येथे झालेल्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी विमानाने देखील प्रवास केला होता. हा प्रवासाचा सर्व खर्च इतर लोकांनी केला.

नागटिळक यांना फक्त साहित्य संमेलनाची आवड आहे असे नाही. ते कीर्तन करतात. नटसम्राट या नाटकाचा एकपात्री प्रयोगही फुलचंद पार पडतात. आत्तापर्यंत नटसम्राटचे ५३१० एकपात्री प्रयोग नागटिळक यांनी सादर केले आहेत. शाळा-महाविद्यालय, वाड्या-वस्त्या, युवा फेस्टिवल, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी नटसम्राट या नाटकाचे एकपात्री प्रयोग सादर केले आहेत. शिक्षकांनी कसे शिकावावे आणि कसे शिकवे हा विषय घेऊन त्यांनी ३२०० महाविद्यालयात जाऊन लेक्चर दिले आहेत. संत गाडगेबाबा यांचा पोशाख घालून अगदी ते वेगवेगळ्या कार्यक्रमाला, साहित्य संमेलनाला जातात. बारावी नापास असलेल्या नागटिळकांची माय भूमी हा काव्यसंग्रह सोलापूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात प्रकाशित झाला.

दिसायला आणि परिस्थितीने सर्वसाधारण असलेल्या नागटिळकांची कुसुमाग्रजांनी १९९७ साली भेट घेतली. त्यानंतर कुसुमाग्रजांनी ते करत असलेल्या कामाबद्दल नागटिळकांना शुभेच्छा पत्र लिहिलेले आहे. साहित्यातील दिग्गज लोक देखील फुलचंद नागटिळक यांना ओळखतात. आनंद यादव, जगदीश खेबुडकर, नारायण सुर्वे, यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे. तर शांता शेळके, विंदा करंदीकर यांची भेट घेतली आहे. राजा मंगळवेढेकर, इंद्रजीत भालेराव, विठ्ठल वाघ, फ.मू. शिंदे पासून ते साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यापर्यंत सर्व लोक नागटिळक यांना ओळखतात. फुलचंद नागटिळक यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पाच मराठी चित्रपट आणि एका हिंदी चित्रपटात त्यांनी आपली भूमिका सादर केली आहे. त्याचबरोबर, प्रेम रंग, घुंगराची साथ, कुराड एक घाव प्रेमाचा, अशा चित्रपटांमध्ये तर हिंदीमध्ये असलेला बाबासाहेब या चित्रपटात त्यांनी आपली कला सादर केली. अगदी भारतात कुठेही साहित्य संमेलन भरवले तरी मी तेथे जाणार, अशी ठाम भूमिकाच नाग टिळकांची असते.

हेही वाचा- 'पुस्तक चाळण्यात जी मजा आहे ती ई-बुक मध्ये कुठे?'

Intro:या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही मात्र मी यासंदर्भात काही लोकांकडून मी खात्री करून घेतली त्यामुळे ही स्टोरी स्पेशल घ्यावी याला स्पेशल इफेक्ट द्यावा

साहित्याची भूक भागवण्यासाठी पायी चालत,सायकल,आणि विमानाने प्रवास गाडगेबाबांच्या वेशात 27 संमेलनात सहभाग

उस्मानाबाद - साहित्याची भूक भागवण्यासाठी कोण कुठला प्रयोग अवलंबवेल हे काहीच सांगता येत नाही फुलचंद नागटिळक हे असे अवलिया आहेत की ज्यांनी सत्तावीस साहित्यसंमेलन पाहिले आहेत काही वेळेला पायी चालत जाऊन, सायकल ने जाऊन, माल वाहुतक ट्रक,तर कधी विमानात जाऊनही यांनी हे साहित्य संमेलनाला हजेरी लावली आहे त्यांनी सुरुवातीला कोल्हापूर येथे 1992 साली झालेल्या साहित्य संमेलनाला हजेरी लावली त्यानंतरचे प्रत्येक साहित्य संमेलनात फुलचंद नागटिळक यांनी सहभाग घेतला कोल्हापूर, सातारा, घुमान, परभणी, आळंदी, अहमदनगर, पणजी येथे झालेल्या साहित्य संमेलन हे माढा तालुक्यातील खैरगाव या त्यांच्या गावापासून चे पणजी पर्यंत पायी चालत जाऊन या संमेलनाला हजेरी लावली तर परभणी येथे झालेल्या साहित्य संमेलनाला सायकलने गेले हे कमी म्हणून की काय..? अंदमान येथे झालेल्या साहित्य संमेलनात विमानाने प्रवास केला आणि हा प्रवासाचा सर्व खर्च इतर लोकांनी केला फक्त साहित्य संमेलनाची आवड आहे असे नाही फुलचंद नागटिळक कीर्तन करतात नटसम्राट या नाटकाचा एकपात्री प्रयोगही फुलचंद पार पडतात आत्तापर्यंत नटसम्राट 5310 एकपात्री प्रयोग नागटिळक यांनी सादर केले आहेत शाळा-महाविद्यालय वाड्या-वस्त्या युवा फेस्टिवल अशा ठिकाणी जाऊन त्यांनी नटसम्राट या नाटकाचे एकपात्री प्रयोग सादर केलेत, शिक्षकांनी कसे शिकावे आणि कसे शिकवावे हा विषय घेऊन 3200 महाविद्यालयात जाऊन लेक्चर दिले आहे संत गाडगेबाबा यांचा पोशाख घालून अगदी ते अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाला साहित्य संमेलनाला जातात बारावी नापास असलेले नागटिळकांचा माय भूमी हा काव्यसंग्रह सोलापूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात प्रकाशित झाला दिसायला आणि परिस्थितीने सर्वसाधारण असलेले नागटिळकांना कुसुमाग्रजांनी 1997 साली भेट घेतली त्यानंतर कुसुमाग्रजांनी ते करत असलेल्या कामाबद्दल शुभेच्छा पत्र लिहिलेले आहे तर साहित्यातील दिग्गज लोकही फुलचंद नागटिळक यांना ओळखतात आनंद यादव, जगदीश खेबुडकर, नारायण सुर्वे, यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे तर शांता शेळके,विंदा करंदीकर, यांची भेट घेतली आहे राजा मंगळवेढेकर, इंद्रजीत भालेराव, विठ्ठल वाघ, फ.मो. शिंदे पासून ते साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यापर्यंत सर्व लोक नागटिळक यांना ओळखतात फुलचंद नागटिळक यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे पाच मराठी चित्रपट आणि एका हिंदी चित्रपटात त्यांनी आपली भूमिका सादर केले आहे प्रेम रंग,घुंगराची साथ, कुराड एक घाव प्रेमाचा, अशा चित्रपटांमध्ये तर हिंदी मध्ये असलेला बाबासाहेब या चित्रपटात त्यांनी आपली कला सादर केली अगदी भारतात कुठेही साहित्य संमेलन भरवलं तरी मी तेथे जाणार अशी ठाम भूमिकाच नाग टिळकांची असते असे साहित्याची भूक असलेले नागटिळकांनी ईटीव्ही भारतचे चर्चा केलीय

Body:यात वन-टू-वन आहे

Conclusion:कैलास चौधरी
ईटीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.