ETV Bharat / state

नंदुरबार - कुत्र्यांवर हल्ला करणारा बिबट्या कॅमेर्‍यात कैद - leopard news

तळोदा तालुक्यातील आमलाड शिवारातील शेतात बिबट्याने दोन कुत्र्यांवर हल्ला केला होता. कुत्र्यांवर हल्ला करणार्‍या बिबट्या वनविभागाच्या ट्रॅप कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

बिबट्या
बिबट्या
author img

By

Published : May 7, 2020, 11:00 AM IST

Updated : May 7, 2020, 6:00 PM IST

नंदुरबार - तळोदा तालुक्यातील आमलाड शिवारातील शेतात बिबट्याने दोन कुत्र्यांवर हल्ला केला होता. कुत्र्यांवर हल्ला करणार्‍या बिबट्या वनविभागाच्या ट्रॅप कॅमेर्‍यात कैद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने आमलाड शिवारात धुमाकूळ घातला होता.

तळोदा तालुक्यातील अमलाड शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. लोक असल्यामुळे जंगल शिवारात निर्मनुष्य असल्यामुळे बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्यांना फस्त केले होते. नितिन वाणी यांच्या शेतात बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला केल्यानंतर परिसरात दहशत निर्माण झाली होती. नगरसेवक गौरव वाणी यांनी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. वनविभागाने याची दखल घेत दोन ट्रॅप केमॅरे लावले होते. त्यात मंगळवारी (दि. 5 मे) रात्री शेतात फिरणारा बिबट्या कॅमेर्‍यात कैद झाला होता. बुधवारी (दि. 6 मे) सकाळी या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

आमलाड शेत शिवारात रात्रीच्या सुमारास बिबट्याने वाणी यांच्या पाळीव कुत्र्याचा फडशा पडल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. तसेच बिबट्याचा या परिसरात सतत वावर वाढत होता. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली होती.

हेही वाचा - नंदुरबार शहर कोरोनामुक्त! चौघांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात दिला डिस्चार्ज

Last Updated : May 7, 2020, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.