उस्मानाबाद - मागील आठ दिवसांपासून दिवसभर ढग दाटून येत होते. तर मध्येच सूर्य नारायणाचे दर्शन होत. त्यामुळे पाऊस येतो का नाही असा प्रश्न पडला होता. मात्र, कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात सरासरी १५१.४१ मिलिमीटर एवढी नोंद करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील लहान मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा होण्यासाठी व भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे वाळत चाललेल्या पिकांना आधार मिळाला आहे. मागीलवर्षी सरासरी २७०.९१ मिलिमीटर एवढी पावसाची नोंद करण्यात आली होती. मात्र, यावर्षी आत्तापर्यंत सरासरी फक्त १५१.४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.