नाशिक - शहरातील नामांकित हॉटेलमध्ये जेवनाच्या वादातून एका 25 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर तातडीने पोलिसांनी सहा संशयित आरोपींना अटक केले आहे. शहरातील नामांकित असलेल्या सोनाली मटन भाकरी या हॉटेलमध्ये जेवनाच्या वादातून प्रसाद भालेराव नामक पंचवीस वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. प्रसाद भालेराव ज्या टेबलवर जेवन करत होता त्याच्या शेजारी असलेल्या टेबलवर बसणारे युवकांनी त्याची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी पोलीस तपासात समोर आले आहे. हत्या केल्यानंतर या युवकाने पळ काढला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चौधरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तातडीने या आरोपींचा शोध सुरू करत सहा संशयित आरोपींना अटक केले आहे.
दरम्यान कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हॉटेलमधून फक्त पार्सल सेवा ही सुरु आहे. मग असे असताना देखील सोनाली मटन भाकरी याठिकाणी कोणाच्या आशीर्वादाने हॉटेलमध्ये बसून जेवण करण्यास परवानगी दिली जात होती. असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विशेष बाब म्हणजे, नाशिक पोलीस आयुक्तालयाची वार्षिक तपासणी करण्यासाठी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक नाशिक दौऱ्यावर असताना अचानक ही घटना घडली आहे.
हॉटेल केले सिल
नियमांचे उल्लंघन करत रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याने सिडको परिसरातील हॉटेल सोनाली मटन भाकरी सील करण्यात आली आहे. रात्री याठिकाणी जेवणासाठी आलेल्या तरुणांमध्ये झालेल्या वादातून एका जणांची हत्या करण्यात आल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन आणि मनपा अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.