ETV Bharat / state

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे एकाची आत्महत्या

शेतात राहत असलेला भाडेकरू जनार्दन शंकर जामकर हा राहत असलेल्या खोलीत टीव्ही चालू असल्याचा आवाज आला, म्हणून मी त्यास आवाज दिला व दरवाजा वाजविला. परंतु आतून कोणताच प्रतिसाद दिला नाही.

police
दिंडोरी पोलिस स्टेशन
author img

By

Published : Aug 29, 2020, 3:17 PM IST

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील जानोरी शिवारातील अशापुरा गोडवूनजवळ असलेल्या शेतातील घरात भाडेकरुने आत्महत्या केली. जनार्दन शंकर जामकर (वय 35, जऊळुके दिंडोरी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जानोरी शिवारातील10 मैल मोहाडी जानोरी रोड लगत असलेल्या माझ्या शेेेतात आज सकाळी नेहमीप्रमाणे सात वाजेच्या सुमारास गाईचे दूध कढण्यासाठी आलो होतो. मला माझ्या शेतात राहत असलेला भाडेकरू जनार्दन शंकर जामकर हा राहत असलेल्या खोलीत टीव्ही चालू असल्याचा आवाज आला, म्हणून मी त्यास आवाज दिला व दरवाजा वाजविला. परंतु आतून कोणताच प्रतिसाद दिला नाही. दरवाजा जवळील खिडकीतून बघितले असता आत जनार्धन जामकर या युवकाने लोखंडी पाइपला साडीने बांधून गळफास घेतल्याचे पाहिले अशी माहिती शेेेतमालक पांडुरंग आपसुदे यांनी पोलिसांना दिली.

दिंडोरी पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पंचनामा करून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, पोलीस हवालदार शंकर जाधव हे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.