ETV Bharat / state

लग्नाला नकार दिल्यानं प्रेमवीरानं वाहनांची केली जाळपोळ

Nashik Crime News : एकतर्फी प्रेमातून अनेक गुन्हेगारी घटना घडत असल्याचे नेहमीच उघडकीस येते. नाशिक शहरात (Nashik News) देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तब्बल सात वाहने पेटवून दिल्यानं परिसरात खळबळ उडाली.

Nashik Crime News
सात वाहनांची जाळपोळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 9:04 PM IST

एकतर्फी प्रेमातून सात वाहनांची जाळपोळ

नाशिक Nashik Crime News : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने त्याच्या साथीदारासह तरुणीच्या वाहनासह तब्बल सात वाहने पेटवून दिल्याची घटना घडली. नाशिकच्या काठे गल्ली परिसरात ही घटना उघडकीस आलीय. यात फिर्यादी तरुणीच्या दोन गाड्या आणि इतर पाच अशा सात वाहनांची जाळपोळ केली. या घटनेत वाहने जळून खाक झाल्यानं मोठे नुकसान झालं आहे. या घटनेप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी अवघ्या काही तासात दोघांना अटक केली आहे.

विवाह करण्याचा लावला तगादा : या घटनेतील फिर्यादी तरुणी आणि संशयित आरोपी सुमित पगारे (Sumit Pagare) यांची ओळख आहे. संशयित पगारे याने फिर्यादी तरुणीकडे सातत्याने विवाह करण्याचा तगादा लावत होता. तरुणीने यास नकार दिल्यानं संशयित पगारे यास राग आला. त्यानं सहकारी संशयित विकी जावरे याच्या मदतीनं तरुणीच्या दुचाकीसह अन्य दुचाकी, चारचाकी वाहन आणि रिक्षाची जाळपोळ केली. स्थानिक रहिवाशांनी तातडीने पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बहुतांशी वाहने जळून खाक झाली होती. या घटनेनं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ही वाहने जाळून खाक : संशयित आरोपी सुमित पगारे याने त्याचा साथीदार विकी जावरे यांच्या मदतीनं इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेली युवतीची दुचाकी एमएच १६ जीबी 3634 गाडीवर पेट्रोल टाकून पेटवून दिली, आगीच्या भडक्याने पार्किंगमध्ये उभ्या असलेली रिक्षा एमएच १९ एझेड 2929, कार एमएच 15 एफयु 7457, दुचाकी एमएच 15 जेडी 2268, दुचाकी एमएच 15 टीव्ही 7619, एमएच 15 इजी 0133 ही वाहने जळून खाक झाली. तर इमारतीच्या पार्किंग मधील वायरिंगला आग लागल्यानं शॉर्टसर्किट झाला. नागरिकांनी वेळीच अग्निशामक दलास कळवल्याने आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं. अन्यथा इमारतीमध्ये आग लागली असती. वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत काही तासात संशयितांना अटक केली.

हेही वाचा

  1. Dhule Riot : आदिवासी दिनाचे बॅनर फाडल्याच्या वादातून दोन गटात दंगल, आमदारांच्या गाडीसह 8 वाहने फोडली
  2. वारजेतील रामनगर परिसरात तीन दुचाकी पेटवल्या; पाच वाहनांचे नुकसान
  3. Maratha Kranti Morcha: नांदेडात मराठा आंदोलक आक्रमक; संतप्त आंदोलकांनी मालेगाव-नांदेड रस्त्यावर पेटवली बस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.