येवला : येवला तालुक्यातील खिर्डीसाठे येथील योगेश इप्पर या शेतकऱ्याने 70 गुंठ्यामध्ये सीताफळांची 600 झाडांची लागवड केली. याद्वारे हा शेतकरी भरघोस उत्पन्न घेत आहे. या सीताफळांची ग्रेडीग व पॅकिग योग्य पद्धतीने करून सदर सीताफळे बांग्लादेश येथे निर्यात केली जात ( Yeola Custured Apple Export to Bangladesh ) आहेत.
बारावीपर्यंत शिक्षण : येवला तालुक्यातील खिर्डीसाठे येथील प्रगतिशील शेतकरी योगेश सूर्यभान इप्पर या तरूण शेतकऱ्यांने फळबाग लागवड केली व त्यातुन त्यांना चांगला नफा मिळत आहे. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून त्यानंतर त्यांनी आधुनिक शेती अगदी चांगल्या पद्धतीने करायला सुरुवात केली. शेतात नवनवीन प्रयोग करत शेतीमध्ये भरघोस उत्पन्न काढत ( Huge Income From Custured Apple Cultivation ) आहे. त्यामध्ये प्रथम त्यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मदतीने ०.७० गुंठ्यावरती गोल्डन सीताफळाची लागवड केलेली आहे. सिताफळ झाडांची संख्या ६०० असून त्यामध्ये त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. त्याची ग्रेडीग व पॅकिग योग्य पद्धतीने करून सदर फळे बांग्लादेश येथे निर्यात केले जातात.