नाशिक - मालेगाव शहरातील 200 हुन अधिक अनधिकृत प्लास्टिक गिट्टी कारखाने सुरू आहेत. यासंदर्रभात हरित लवादाकडे याची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी याचिकेच्या सुनावणी सुरू असतानाच कारखाने सील करण्याची करवाई प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेने केली आहे. या सिलिंगमुळे 50 हजारा पेक्षा जास्त मजुर बेरोजगार होणार आहे.
हेही वाचा -
नाशिकमध्ये पोलीस ठाण्यासमोर पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू
एवढ्या मोठ्या प्रमाणता जर कारखाने बंद झाले तर या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगार बेरोजगार होतील. यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. या कामगारांनी आम्हाला रोजगार द्या नाही, तर चोरी करण्याची परवानगी द्या असे निवेदन अप्पर जिल्हा अधिकारी लक्ष्मण राऊत यांना दिले आहे. हे कारखाने बंद झाले तर शहरात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढणार आहे. बेरोजगारी मुके संतप्त कामगारांनी थेट अप्पर जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन चोरी करण्याची परवानगी मागीतली आहे. शहरात 28 साईजिंग आणि 200 हुन अधिक कारखाने सील होणार आहे. शहराची आर्थिक नाडी पॉवरलूम आणि प्लास्टिक उद्योग असल्याने शहरावर आर्थिक मंदीचे सावट गडद होणार आहे.