ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यातील सातबारा संगणकीकरण आणि डिजिटायझेशन प्रणालीचे काम कौतुकास्पद - महसूलमंत्री

जिल्ह्यातील 1 हजार 978 महसूल गावांपैकी 1 हजार 975 गावांचे सातबारा ऑनलाइन उपलब्ध आहेत. उर्वरित तीन गावांसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाइन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

Revenue Minister Balasaheb Thorat
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Nov 19, 2020, 9:54 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील 1 हजार 978 महसूल गावांपैकी 1 हजार 975 गावांचे सातबारा ऑनलाइन उपलब्ध आहेत. उर्वरित तीन गावांसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाइन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील. जिल्ह्यामध्ये सातबाराचे डिजिटायझेशन आणि संगणकीकरण ही बाब कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या महसूल बाबींच्या आढावा बैठकीत महसूल मंत्री थोरात बोलत होते. थोरात म्हणाले, प्रलंबित ई-फेरफार प्रकरणांबाबत नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रकरणे प्रलंबित राहाणार नाही म्हणून योग्य ती उपाययोजना राबवण्यात यावी. तसेच, सेवा हमी कायद्याद्वारे ई-हक्क प्रणालीवरील कामांचा यशस्वी पाठपुरावा देखील चांगली बाब असल्याचे थोरात यांनी सांगितले.

वाढत्या थंडीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढणार

वाढती थंडी आणि दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी लक्षात घेता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे, येत्या पाच सहा दिवसात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. जिल्ह्यातील 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' सर्वेक्षण मोहिमेमध्ये जवळपास अडीच लाख को-मोर्बिड सापडले असून, त्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात यावे, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळेल, असेही थोरात यांनी सांगितले.

कोरोनाची दुसरी लाट येण्याआधी प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्याच्या महसूल विषयक बाबींची सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये सातबारा संगणकीकरण, कोरोना संभाव्य दुसऱ्या लाटेसंदर्भातील प्रशासनाची पूर्वतयारी, महा राजस्व अभियानमध्ये केलेली कार्यवाही इत्यादी बाबींचा समावेश होता. विविध प्रकरणांमध्ये नोटीस बजावण्यासाठी टपालाद्वारे पत्र पाठवले जात असल्यामुळे त्यात होणारा वेळ वाचवण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये व्हॉट्सअ‌ॅपद्वारे नोटिसेस पाठवण्याचा अभिनव उपक्रम लवकरच सुरू करण्यात येत असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी महसूल मंत्री यांना दिली.

कोरोनाबाबत जिल्ह्याची परिस्थिती बघता मृत्यूदर 1.65 टक्के, तर रुग्ण बरे होण्याचा दर 95 टक्के आहे. मृत्यूदराबाबत राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्याचा 30वा क्रमांक आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील संसर्गबाधितांमध्ये घट झाली आहे. जिल्ह्यात रेमडेसीव्हीर आणि ऑक्सिजनचा पुरवठादेखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच, दिवाळी आणि वाढणारी थंडी यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनामार्फत त्या दृष्टीने व्यवस्थापन करण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा - मनमाड शहरात गवळी बांधवांनी रेड्यांची झुंज लावून केली दिवाळी साजरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.