ETV Bharat / state

व्हिडिओ : नाशकात महिलेचा दुर्गावतार; चाकूधारी चोरट्याला शिकवला धडा

सविता मुर्तडक यांनी एका चोराला चोरी करण्यास प्रतिकार करत पळवून लावले. चोराच्या हातात चाकू असतानासुद्धा सविताने दुर्गावतार धारण करत ताकदीने त्याचा सामना केला. हा सर्व प्रकार सविता यांच्या दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सविता यांचा सत्कार देखील केला
author img

By

Published : May 31, 2019, 10:20 AM IST

Updated : May 31, 2019, 12:49 PM IST

नाशिक - सातपूर परिसरातील अशोकनगर भागात राहणाऱ्या सविता मुर्तडक यांनी एका चोराला चोरी करण्यास प्रतिकार करत पळवून लावले. चोराच्या हातात चाकू असतानासुद्धा सविताने दुर्गावतार धारण करत ताकदीने त्याचा सामना केला. हा सर्व प्रकार सविता यांच्या दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनीदेखील या महिलेच्या धाडसाचे कौतूक केले. तसेच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सविता यांचा सत्कार देखील केला आहे.

व्हिडिओ : नाशकात महिलेचा दुर्गावतार; चाकूधारी चोरट्याला शिकवला धडा

अनेकदा एखादे संकट आले तर माणूस हा घाबरून शांत बसतो किंवा मोठ्या हिंमतीने संकटाचा सामना करतो, अशीच एक घटना नाशिकच्या सातपूर भागातील अशोकनगर परिसरात घडली आहे. सविता मुर्तडक यांचे ग्राहक सेवा केंद्र असून बँकेसंदर्भांत कामे येथे केली जातात. काही दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास एक चोराने तोंडावर रुमाल लावून सविता यांच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दरवाजाची कडी लावून सविता यांना चाकूचा धाक दाखवून पैशाची मागणी केली. पैसे देण्यास सविता यांनी नकार दिला असताना या चोराने त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि एका हाताने टेबलच्या ड्रॉव्हरमधून चाळीस हजार रुपये काढून घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र याच दरम्यान सविता यांनी दुर्गावतार घेत या चोराचा जोरदार सामना करत आपल्यापेक्षा धष्टपुष्ट असलेल्या चोराला चार वेळा खाली पाडले. सविता यांचा आक्रमक पवित्रा बघून चोराने सविता यांचा मोबाइल फोडून पैसे घेऊन फरार झाला. मात्र, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाल्याने काही दिवसांतच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी देखील या महिलेच्या धाडसाचे कौतुक करत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी रणरागिणी सविता यांचा सत्कार केला.

Intro:रणरागिणीचे रूप धारणं करून "त्या" महिलेनं चाकूधारी दरोडेखोराला पळवले...

Body:नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोक नगर भागत राहणाऱ्या सविता मुर्तडक यांनी एका दरोडेखोरांला चोरी करण्यास प्रतिकार करत पळून लावले,दरोडेखोराच्या हातात चाकू असतांना सुद्धा सविताने ताकदीने त्याचा सामना केला,ह्या सर्व प्रकार सविता ह्यांच्या दुकांनाच्या सीसीटिव्हीत कैद झाला असून पोलीसांनी देखील ह्या महिलेच्या धाडसाचे कौतुक करत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ह्या सविता यांचा सत्कार केला...

अनेकदा एखादे संकट आले तर माणूस हा घाबरून शांत बसतो,किंवा मोठ्या हिंमतीने संकटाचा सामना करतो,अशीच एक घटना नाशिकच्या सातपूर भागातील अशोक नगर परिसरात घडली,सविता मुर्तडक ह्याचे ग्राहक सेवा केंद्र असून बँके संदर्भांत इथं कामे केली जातात,काही दिवसांन पूर्वी दुपारच्या सुमार एक दरोडेखोर तोंडावर रुमाल लावून त्यानं सविता यांच्या ऑफिस मध्ये प्रवेश करून दरवाजाची कडी लावून सविता यांना चाकूचा धाक दाखवून पैशाची मागणी केली...अशात पैसे देण्यास सविता ह्यांनी नकार दिला असतांना ह्या चोराने त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवत जीवे मारण्याची धमकी दिली... आणि एक हाताने टेबल च्या ड्रॉव्हर मधून चाळीस हजार रुपये काढून घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला,मात्र ह्याच दरम्यान सविता ह्यांनी रणरागिणीचे रूप घेत ह्या दरोडेखोरांचा जोरदार सामना करत आपल्या पेक्षा धस्टपुष्ट असलेल्या दरोडेखोराला चार वेळा खाली पाडले,सविता ह्याचा आक्रमक पवित्रा बघून ह्या दरोडेखोरानें सविता यांचा मोबाइल फोडून पैसे घेऊन फरार झाला.. मात्र ह्या सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने काही दिवसांतच पोलिसांनी ह्या आरोपला बेड्या ठोकल्या आहेत..पोलीसांनी देखील ह्या महिलेच्या धाडसाचे कौतुक करत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सविता यांचा सत्कार केला..
वन टू वन सविता मुर्तडक
विश्वास नांगरे पाटील..

Conclusion:
Last Updated : May 31, 2019, 12:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.