ETV Bharat / state

पतीच्या प्रेमसंबंधामुळे इंजिनिअर पत्नीची आत्महत्या, पती गजाआड - Nashik Crime news

पूजा महाले (रा. हस्ते दुमाला ता. दिंडोरी) यांचा विवाह येवल्यातील शेखर संजय शिंदे यांच्याबरोबर 17 मे ला झाला होता. विवाहानंतर शेखर एका मुलीशी वारंवार फोनवर बोलायचा. याबाबत पूजाने शेखरला जाब विचारला. मात्र, शेखर त्या मुलीला त्यानंतरही बोलतच होता.

आत्महत्या
author img

By

Published : Nov 13, 2019, 7:34 PM IST

नाशिक - येवला येथील अभियांत्रिकी पदवी असलेल्या विवाहितेने पती व पतीच्या प्रेयसीच्या मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पूजा महाले, असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचे वडिल बाळासाहेब महाले यांनी दिलेल्या तक्ररीवरून पूजाच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

पतीच्या प्रेमसंबंधामुळे इंजिनिअर पत्नीची आत्महत्या

हेही वाचा - नाशिककरांना हवे स्थिर सरकार

याबाबत अधिक माहिती अशी की, पूजा महाले (रा. हस्ते दुमाला ता. दिंडोरी) यांचा विवाह येवल्यातील शेखर संजय शिंदे यांच्याबरोबर 17 मे रोजी झाला होता. विवाहानंतर शेखर एका मुलीशी वारंवार फोनवर बोलायचा. याबाबत पूजाने शेखरला जाब विचारला. मात्र, शेखर त्या मुलीशी त्यानंतरही बोलतच होता. दरम्यान, पूजा ही भाऊबीजेसाठी माहेरी गेली असता, तिला तू परत येऊ नको, तुला घटस्फोट देणार आहे, असे तिच्या पतीने सांगितले. त्यामुळे चिंतेत पूजाने विषारी औषध सेवन केले. कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पूजाचा मृत्यू झाला.

हेही वाचा - लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले नाशिकचे श्री व्यंकटेश बालाजी मंदिर

याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधिकारी प्रविण पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साहेबराव वडजे, पोलीस शिपाई किरण घुळे करत आहेत

Intro:नाशिक =येवला हे सासर व दिंडोरी तालूक्यातील हस्ते दुमाला ता दिंडोरी येथील माहेर असलेल्या अभियांत्रिकी पदवी असलेल्याविवाहीतेने पती व प्रेयसीच्या मानसिक छळ व संबधामुळे आत्महत्या केल्याची फिर्याद मयताच्या वडीलांनी बाळासाहेब महाले यांनी दिल्याने प्रेयसी व पती विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली तर प्रेयसीची चौकशी सुरु आहे.

Body:याबाबतची पोलीसांकडुन प्राप्त माहीती अशी पुजा महाले राहणार हस्ते दुमाला यांचा विवाह शेखर संजय शिंदे यांचेबरोबर दिनांक 17/5/2019 रोजी संपन्न झाला. विवाहानंतर शेखर एका मुलीशी वारंवार फोनवर बोलत असल्याची बाब पुजा शिंदे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याचा जाब शेखरला विचारला मात्र शेखरच्या वर्तनात फरक पडला नाही. दरम्यान शेखरच्या कुटुंबिय सासु व नणंद यांना हा प्रकार सांगितला व त्यांनी शेखरची कानउघडणी केली काही दिवसानंतर रक्षाबंधन सणाला पुजा माहेरी आल्या. तेव्हा त्यांची प्रकृती व्यवस्थित नसल्याने कुटुंबियांनी चौकशी केली. तदनंतर भाऊबिजेसाठी परत माहेरी आल्या तेव्हाही पुजा काळजीत असल्याची बाब निदर्शनास आली काही दिवसानंतर पुजा माहेरी असताना पती शेखर व प्रेयसी यांनी भ्रमणध्वनीवरुन पुजा यांचेशी संपर्क साधला व सांगितले की सहा महिन्यात शेखर फारकत देणार असुन तु येवला येथे येउ नको असे सांगुन पुजा यांचे मानसिक खच्चीकरण केले. Conclusion:सहनशिलतेचा अंत झाल्याने पुजाने विषारी औषध सेवन केले ही बाब कुटुंबियांना समजली वणीच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल कैले उपचारानंतर त्यांना अस्वस्थ वाटु लागले नाशिकला पुजा यांना हलविले मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणजोत मालविली.पती व प्रेयसीने मानसिक खच्चीकरण केल्याने पुजाने जीवनयात्रा संपविल्याची फिर्याद दाखल केल्याने पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील वणी पोलीस ठाण्याचे अधिकारी Api प्रविण पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार साहेबराव वडजे, पोलीश शिपाई किरण घुळे आदी करित आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.