ETV Bharat / state

नाशिक-मुंबई महामार्गावर कार व ट्रकचा अपघात; महिलेचा मृत्यू तर तीन जखमी - नाशिक-मुंबई महामार्ग अपघात महिला मृत्यू

रविवारी सायंकाळी नाशिक-मुंबई महामार्गावर गोंदे फाट्याजवळ नाशिकहून मुंबईकडे जात असलेल्या कारला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात धडकेत एका महिलेचा मृत्यू तर तीघेजण जखमी झाले.

Nashik Accident
नाशिक अपघात
author img

By

Published : Mar 15, 2021, 8:17 AM IST

नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर गोंदे फाट्याजवळ कार व ट्रक यांच्यात अपघातात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर तीघे जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या मदतीमुळे तातडीने सर्वांना उपचारासाठी नाशिकला पाठवण्यात आले.

नाशिक-मुंबई महामार्गावर कार व ट्रकचा अपघात

दुसऱ्या लेनवर फेकली गेली कार -

रविवारी सायंकाळी नाशिक-मुंबई महामार्गावर गोंदे फाट्याजवळ नाशिकहून मुंबईकडे जात असलेल्या कारला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात धडकेमुळे कार दुभाजकावरून दुसऱ्या लेनवर फेकली गेली. त्यामुळे कारमधील सर्व आतमध्ये दबले गेले. नागरिकांनी गाडीतील सर्वांना बाहेर काढले. कारमधील पितांबर जगन्नाथ पाटील (वय 65), रेखा कैलास पाटील (वय 50), कैलास जगन्नाथ पाटील (वय 53), शशिकला पितांबर पाटील (वय 60), हे गंभीर जखमी झाले. त्यांना जगत्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने तात्काळ नाशिक येथील वक्रतुंड रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना शशिकला पितांबर पाटील या महिलेचा मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.