ETV Bharat / state

नाशिकला 120 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज, फक्त 85 मेट्रिक टन उपलब्ध -जिल्हाधिकारी

नाशिक जिल्ह्याला 120 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून सद्या केवळ 85 मॅट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. तसेच आज दुपारपर्यंत औरंगाबाद आणि नगरमधून ऑक्सिजनची मदत मिळणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

nashik collector statement on oxygen
'नाशिकला 120 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज; फक्त 85 मॅट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध'
author img

By

Published : Apr 22, 2021, 2:51 PM IST

Updated : Apr 22, 2021, 4:10 PM IST

नाशिक - सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्याला 120 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून सद्या केवळ 85 मॅट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. तसेच गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनची मागणी दुप्पटीने वाढली असल्याचेही त्यांनी म्हटले.

18 मॅट्रिक टन ऑक्सिजनची तूट -

नाशिकमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत असून रोज 6 हजाराच्या पटीत नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. जिल्ह्यातील सर्वच सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमधील बेड फुल झाली असून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने उद्योगांना लागणारा 100 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय कामासाठी वळवून सुद्धा ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. आज नाशिक जिल्ह्याला 120 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून केवळ 85 मॅट्रिक टन ऑक्सिजन सद्या उपलब्ध आहे. त्यामुळे जवळपास 18 मॅट्रिक टन ऑक्सिजनची तूट निर्माण झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांत दुप्पटीने ऑक्सिजनची मागणी वाढल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा अतिरीक्त वापर -

काही खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा अतिरीक्त वापर होत असून हॉस्पिटलने सुद्धा ऑक्सिजनचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. तसेच आज दुपारपर्यंत औरंगाबाद आणि नगरमधून ऑक्सिजनची मदत मिळणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

रुग्णांना शिफ्ट करण्याची वेळ -

नाशिकच्या सिक्स सिगमा, श्री गुरूजी हॉस्पिटल, नारायणी हॉस्पिटल सारख्या बहुतांश हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने नातेवाईकांना फोन करून रुग्ण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यास सांगितल्याने नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. एकीकडे सर्वच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड फुल असून रुग्णांच्या नातेवाईकांसमोर अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा - भावासाठी केली ऑक्सिजनची तजवीज, पण अन्य रुग्णांची तडफड पाहून 'त्याने' सोडले प्राण

Last Updated : Apr 22, 2021, 4:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.