नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या खासदार आदर्श ग्राम योजनेची ( Sansad Adarsh Gram Yojana Nashik ) नाशकात प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून आले आहे. शिवसेना खासदार हेमंत गोडसेंनी ( Shiv Sena MP Hemant Godse ) गाजावाजा करत अंजनेरी गाव दत्तक ( Anjaneri village adopted ) घेतले. मात्र 7 वर्ष उलटूनही या गावाचा चेहरा काही बद्दलला नाही. आजही या गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट ( Women suffer for water ) करावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खासदार गोडसेंनी या गावाकडे पाहिले सुद्धा नाही, असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
नाशिकपासून अवघ्या पंचवीस किलोमीटर असलेले अंजनेरी गाव खासदार हेमंत गोडसे यांनी दत्तक घेतले होते. आता गावात सुधारणा होणार, रस्ते, पाणी, लाइटची समस्या दूर होणार अनेक सुविधा होणार, असे गावकऱ्यांना वाटले होते. मात्र सात वर्ष उलटूनही या गावाचा कायापालट झाला नाही. उलट या गावाची अवस्था अधिकच बिकट झाली. ना गावात चांगले रस्ते, ना इतर सुविधा, महिलांना रोज हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी काढावे लागते. मात्र या सर्व गोष्टीकडे खासदार गोडसेंनी दुर्लक्ष केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. जर विकासच करायचा नव्हता तर गाव दत्तक घेतले का? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
अशी आहे खासदार आदर्श ग्राम योजना : 2014 मध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी त्यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी खासदार आदर्श ग्राम योजना जाहीर केली होती. या योजने अंतर्गत खासदारांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात एक गाव दत्तक घेऊन त्या गावाला आदर्श गाव बनवावे, अशी अपेक्षा होती. अशा गावात स्वच्छता राखणे, अंगणवाडीत मुलांना प्रवेश देणे, गाव झाडे लावून हरित करणे, आरोग्याच्या संपूर्ण सुविधा या गावात पुरविणे, अशी कामे खासदारांच्या वतीने करणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे गावांचा वाढदिवस साजरा करून गावातील ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य सेनानी शहिद कुटुंबियांचा सन्मान करणे, असे विविध कार्यक्रम खासदारांनी राबविणे या योजनेअंतर्गत अपेक्षित आहे. अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी मात्र जिल्ह्यातील एकही गाव अद्याप दत्तक घेतले नाही, ही आश्चर्याची बाब आहे.
'काम काहीच झाले नाही' : खासदार हेमंत गोडसे यांनी आमचे अंजनेरी गाव दत्तक घेतले. त्यांनी सुरुवातीला अनेक घोषणा केल्या. वीज, पाणी, रस्ते चांगले करू. मात्र त्यापैकी बरेच काम झाली नाही. अनेक वर्षे खासदार गावात आले नाही. आज आमचे गाव त्र्यंबकेश्वर जवळ असून सुद्धा दुर्लक्षितच आहे. आजूबाजूच्या वाड्यात कुठलीही पाण्याची सोय नाही. गावाजवळ धरण असून सुद्धा नळाद्वारे पाणी मिळत नाही. महिलांना पायपीट करून विहिरीवर जाऊन पाणी भरायला लागते, असे गावकऱ्यांनी म्हटले आहे.
'अंजनेरीत बरेच काम झाले': 2016 मध्ये खासदार हेमंत गोडसे यांनी अंजनेरी गाव दत्तक घेतल्यानंतर गावाच्या विकासाकरीता आराखडा तयार करण्यात आला. गावात पाणी, लाइट, रस्ते या समस्या होत्या. त्यात सुरुवातीला सांसद आदर्शग्राम योजनेअंतर्गत कृती आराखड्यानुसार विविध विकासकामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारत
बांधण्यात आली. त्यानंतर काही रस्ते करण्यात आले असून त्याचे डांबरीकरण लवकरच होणार आहे. गावाची भौगोलिक परिस्थिती डोंगरासारखी आहे. त्यात आठ वाडे असून त्यातील चार गावात विहिरीद्वारे पाण्याची सोय लावून दिली आहे. आज 90 टक्के पाण्याची अडचण नाही. विजेची सोय झाली आहे, असे सरपंच राजेंद्र बराडे यांनी सांगितले आहे.
'तीर्थक्षेत्र म्हणून अंजनेरीचा विकास करणार' : पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून गावागावांतील तीर्थक्षेत्रांचा विकास होत आहे. मोदी यांच्या संकल्पनेतील ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत देशातील आठ तीर्थक्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव श्री त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्राचा समावेश झाला आहे. या योजनेत अंजनेरीचाही समावेश व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.
हेही वाचा - Sansad Adarsh Gram Yojana Amravati : खासदार नवनीत राणांच्या जिल्ह्यात खासदार आदर्श ग्राम योजनेचा फज्जा!