नाशिक : बहिणीकडे वाईट नजरेने पाहिल्याची (looking dirty eye at sister) कुरापत काढत बांधकाम बिगाऱ्याने वॉचमनची हत्या केल्याची घटना (watchman killed by construction worker) वाढणे कॉलनीत घडली आहे. याबाबत म्हसरुळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल (murder case registered in Mhasrul police station) झाला. पोलिसांनी संशयित बिगाऱ्याला अटक (accused arrest for watchman killing) करण्यात आली आहे. latest news from Nashik, Nashik Crime
आरोपी मारेकऱ्याला अटक - नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून खुनाचे सत्र सुरूच आहे. किरकोळ कारणावरून अशीच एक घटना घडली आहे. नाशिकच्या वाढणे कॉलनी परिसरातील हनुमान मंदिर जवळ एक बांधकाम साईटवर बिगारी असलेल्या संशयित योगेश डंबाळे कामगाराने दारूच्या नशेत माझ्या बहिणीकडे वाईट नजरेने का बघतो म्हणून डोक्यात लाकडी दांड्याने वार करून वॉचमन सतलाल मुकूरी प्रसाद (वय 40 रा. उत्तर प्रदेश) याची हत्या केली. या म्हसरुळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून संशयित योगेश पंढरिनाथ डंबाळे (27 रा. ननाशी) या बिगाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
खुनाची दुसरी घटना - नाशिक मध्ये दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या संतू वायकंडे या कर्मचाऱ्यांची दोन हजारांच्या उसनंवारी वरून चुलत काकानेच दारूच्या नशेत हत्या केल्याची घटना घडली होती. 3 दिवसात किरकोळ कारणावरून 2 खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच भाजप पदाधिकारी विक्रम नागरे यांच्या घरावर टोळक्याने चाकू-सुरे घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करत त्यांच्या आईला धमकवण्याचा प्रकार घडला आहे. एकूणच वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिककर भयभीत झाले आहेत.