ETV Bharat / state

नाशिकमध्ये पाच रेमडिसिविर इंजेक्शनसह वार्डबॉयला अटक - नाशिक रेमडेसिविर इंजेक्शन परिस्थिती बातमी

पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबादगांव येथे सापळा रचून ही कारवाई केली आहे.

Remdesivir injection robbery
रेमडेसिविर इंजेक्शन चोरी
author img

By

Published : Apr 25, 2021, 11:53 PM IST

नाशिक - काही दिवसांपूर्वी रेमडिसिविर इंजेक्शन चोरी केल्याप्रकरणी गुरुजी रुग्णालयातील तीन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना आनंदवली पोलिसांनी अटक केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा पंचवटीतील मखमलाबाद परिसरात वार्डबॉयला गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने 5 रेमडिसिव्हर सह अटक केली.

एक लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त -

याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे डॉ. सुरेश देशमुख यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यांनतर मखमलाबादच्या मयूर पितांबर सोनवणे या संशयितावर फसवणूक, अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याच्याकडून 5 रेमडिसिव्हर इंजेक्शन, मोबाइल व दुचाकी असा एक लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबादगांव येथे सापळा रचून ही कारवाई केली आहे.

रुग्णांचेच डोसनंतर उरलेले इंजेक्शन -

मयुर सोनवणे हा एका नामांकित रुग्णालयात वार्डबॉय म्हणून काम करत असून त्याने विनापरवाना बाळगलेले रेमडिसिविर कुठूनही विकत घेतलेले नाही. वॉर्डबॉय असताना रुग्णांनी विकत आणलेल्या इंजेक्शनपैकी डोस दिल्यानंतर शिल्लक राहिलेले इंजेक्शन संबंधित रुग्णाला परत न देता ते स्वतःजवळ ठेवले. त्यानंतर ते काळ्या बाजारात विक्री केल्याची माहिती पोलीस दिली आहे.

रेमडिसिव्हरचा काळाबाजार सुरूच -

कोरोना रुग्णाला अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या रेमडिसिव्हर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा असताना या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीने हैदोस माजविला आहे. 1200 रुपयांचे हे इंजेक्शन 20 ते 40 हजार रुपयांना विक्री करून रुग्णांच्या असहायतेचा गैरफायदा घेत लूटमार सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.