ETV Bharat / state

नाशिक : कोरोनाचा 'हॉटस्पॉट' ठरलेला वडाळा गाव परिसर सील - wadala corona updates nashik news

शहरातील उपनगरासोबतच ग्रामीण भागातही करोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्यात शहरातील सर्वांत जास्त रुग्ण वडाळा गाव परिसरातील आहेत. त्यामुळे वडाळा गाव शहरातील हॉटस्पॉट बनले आहे. जिल्हा प्रशासनाने दाट वस्तीचा वडाळा गाव परिसर संपूर्ण सील केला आहे.

 नाशिक; कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याने वडाळा गाव परिसर सील

author img

By

Published : Jun 2, 2020, 3:13 PM IST

नागरिकांची
नागरिकांची आरोग्य तपासणी करताना आरोग्य कर्मचारी

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून वडाळा गाव परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून नाशिक महानगरपालिकेने वडाळा गावाचा संपूर्ण परिसरात सील केला आहे. तर, प्रत्येक घरातील व्यक्तींची आरोग्य तपासणी केली जात आहे. तर, दुसरीकडे मालेगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.

मालेगावनंतर आता नाशिक शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून नाशिक शहरातील वडाळा गाव परिसरात गेल्या दोन तीन दिवसांपासून कोरोनाचे 20 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे, आधीच अडचणीत सापडलेल्या जिल्हा प्रशासनाने दाट वस्तीचा वडाळा गाव परिसर संपूर्ण सील केला आहे. ह्या ठिकाणी जाणारे-येणारे रस्ते बंद करण्यात आले असून, येथील प्रत्येक नागरिकांची नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात आहे. येथील कुठल्या व्यक्तीला ताप, सर्दी, घसा दुखणे, खोकला ही कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांना संभाव्य रुग्ण म्हणून शहरातील रुग्णालयाच्या कोरोना कक्षात दाखल करून घेण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यातील आजपर्यंतची कोरोना परिस्थिती -

एकूण कोरोनाबाधित रुग्ण -1255

कोरोनामुक्त झालेले व्यक्ती - 846

उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्ण - 334

एकूण मृत्यू -73

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.