नाशिक - मागील पंधरा दिवसापासून कोरोना रुग्ण संख्येत वाढ ( Corona Patiens Increasing in Nashik ) होत असतांना, दुसरीकडे साथीच्या आजारांनी थैमान घातलं आहे. ( Viral Infection in Nashik ) ताप, सर्दी, खोकल्यासारख्या साथीच्या आजाराने हजारो नाशिककर त्रस्त झाले आहे. सरकारी, खासगी दवाखान्यात रोज रुग्ण संख्येत वाढ होत आहे.
नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी तापमानाचा पारा 10पर्यंत खाली आल्याने कडाक्याच्या थंडीने नाशिककर गारठले होते. ( Nashik Winter Temprature ) मात्र, मागील आठ दिवसापासून पारा काही प्रमाणात वाढला असला तरी थंड हवेमुळे वातावरणात गारवा कायम आहे. परिणामी साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. ( Viral Infection in Nashik )ताप, सर्दी, खोकल्यासारख्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. एकीकडे नाशिक जिल्ह्यात रोज 3000च्या जवळपास नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. दुसरीकडे साथीच्या आजराने सरकारी तसेच खासगी दवाखान्यात रोज रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे.
ओपीडीमध्ये गर्दी वाढली -
एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने डोके वर काढले आहे. नाशिक जिल्ह्यात रोज 3 हजार नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजाराचे रुग्ण वाढले आहे. सुरुवातीला दिवसाला आम्ही 50 रुग्ण तपासात होतो. मात्र, आता 100 रुग्ण ओपीडीमध्ये येऊ लागले आहेत. यातील बहुतांशी रुग्णांना थंडी, ताप, खोकला, सर्दीसारखे आजार आहेत. ज्या रुग्णांना कोरोना आजाराचे लक्षण आहेत त्यांना आम्ही प्रथम कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देत आहोत, अशी माहिती खासगी प्रॅक्टिशनर डॉ. वृषाली व्यवहारे यांनी दिली.
काळजी काय घावी -
घराच्या बाहेर पडताना कानटोपी, उबदार कपड्यांचा वापर करावा, मास्क वापरावे, सर्दी, कफ होणार नाही यासाठी थंड पेय सेवन टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कोमट पाण्याचे सेवन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.