हैदराबाद - लेप्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी नुकताच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार स्विकारला आहे. ( Vice Chancellor of MUHS Dr. Madhuri Kanitkar ) जवळपास 39 वर्षांच्या अनुभवसोबत घेऊन त्या पदावर रुजू झाल्या. सैन्यदलात लेफ्टनंट जनरल या पदावर विराजमान होणाऱ्या त्या देशातील तिसऱ्या तर महाराष्ट्रातील पहिल्याच महिला अधिकारी आहेत. तसेच त्यांचे पती देखील सैन्यदलात लेफ्टनंट जनरल या पदावरुन निवृत्त झाले आहेत. लेप्टनंट जनरल पदावर पोहोचलेले हे देशातील पहिले पती पत्नी आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार स्विकारल्यानंतर ईटीव्ही भारतने डॉ. माधुरी कानिटकर यांची विशेष मुलाखत घेतली. ( Dr. Madhuri Kanitkar Interview with ETV Bharat ) या मुलाखतीत त्यांनी विद्यापीठाचे व्हिजन डॉक्युमेंट काय असणार? विद्यापीठाच्या अभ्यासक्रमबाबत, नवीन शिक्षण धोरणाबाबत सविस्तर संवाद साधला. तसेच या विशेष मुलाखतीत त्यांनी आपल्या सैन्यदलातील आठवणींनाही उजाळा दिला. वाचा, सविस्तर मुलाखत..
प्रश्न - मॅम, तुम्ही कुलगुरुपदाचा पदभार स्विकारला. तुमचं अभिनंदन. नवीन जबाबदारी आहे, मनात काय भावना?
उत्तर - मनात आनंदाची भावना आहे. कारण सैन्यदलात 39 वर्ष आव्हाने स्वीकारली. आता हे एक नवीन आव्हान स्विकारते आहे, याचा आनंद आहे. एक दिवसही मध्ये घालवला नाही, याचा आनंद आहे. 31 ऑक्टोबरला सैन्यदलातून निवृत्त झाले आणि 1 नोव्हेंबरला इथे रुजू झाले. थोडीशी मनात apprehension आहे, performance anxiety आहे. कारण खूप अपेक्षा आहेत आणि जॉब नवीन आहे. सेंटरवर आणि सैन्यदलात काम करणं वेगळं आहे. विद्यापाठात, राज्य शासनाचं काम यात थोडा फरक आहे. पण काम करायची उत्सुकता आहे.
प्रश्न - विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल करणार का?
उत्तर - अभ्यासक्रम Medical UG आणि PG याच्यात फारसा आपल्याला बदल करता येत नाही. कारण हा अभ्यासक्रम Medicin Council, Homeopathy Council, Ayush Council ठरवते. पण त्याची अंमलबजावणी करताना किंवा आपल्या राज्याच्या ज्या गरजा आहेत, त्यासाठी वेगवेगळ्या कोर्सेस राबवू शकतो. त्यासाठी पुष्कळ आयडिया आहेत हे एक, दुसरे म्हणजे, नवीन शिक्षण धोरणाने महाविद्यालयांना, विद्यापीठांना पुष्कळ स्वातंत्र्य दिलं आहे. त्याचा वापर करुन आपण विभागीय केंद्रांना त्यांना बळ देण्याचा विचार करण्यात येत आहे. तिसरं म्हणजे Integrated Approach (Multiple Entry and Multiple Exit) घ्यायचा. उदा. एखादा कोर्स करत आहोत उदा. Genetics (branch) त्याचं अभ्यासक्रम तयार करणं सुरू आहे तर त्याच्यात कोणत्याही शाखेतील पदवीधरला प्रवेश घेता येईल. तसेच नवीन शिक्षण धोरणानुसार आपण 40 टक्के ऑनलाईन प्रशिक्षण देऊ शकतो, त्याचा कसा वापर करायचा, याकडे पण आपण लक्ष देऊ शकतो.
प्रश्न - मॅम, सैन्यदलातील तुमचा प्रदीर्घ अनुभव राहिला आहे. असंख्य आठवणी असतील. त्यापैकी एखाद-दोन आठवणी आठवणी शेअर करायला आवडेल?
उत्तर - दोन ज्या आनंदाच्या आठवणी म्हणजे, जेव्हा मी commissioned झाले. घरातील सर्वांचा विरोध होता. सैन्यदलात कशाला जाते, हुशार आहेस, कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल, AFMCच का? सैन्यदलात रुजू झाल्यावर कुठेकुठे पोस्टिंग्स करत राहायचं साहजिकच वडीलांचा विरोध होता. मात्र, हे सर्व जिंकून युनिफॉर्मवर स्टार्स लागले तो एक आनंद होता आणि जेव्हा लेफ्टनंट जनरल झाले तो दिवस. कारण याच्यात सर्वात जास्त भागिदारी शेअर करणारे म्हणजे माझे पती. आम्ही दोघेही भारतातील पहिले दाम्पत्य जे लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोहोचले. ते चार वर्षांआधीच निवृत्त झाले होते. त्यांनी त्यांची रँक आणि टोपी ठेवली होती. ते म्हणाले होते की, तु जेव्हा लेफ्टनंट जनरल पदावर पोहोचशील तेव्हा हे घालेन. मी लेफ्टनंट जनरल पदावर पोहोचल्यावर मला ते घालता आलं. हा एक वेगळा आनंद होता. आणि तसं पाहिलं तर मागे वळून पाहिलं की लक्षात येतं की, बरं झालं मी मागे पाहून मी किती वर चढतेय हे पाहून घाबरले नाही. कारण आपण डोंगर चढतो ना तेव्हा आपल्याला भीती वाटते की आपण इतकं पुढे आलोय. तसं न करता मी पुढे पुढे पाहत राहिले त्यामुळे नवीन शिखरं पाहता आली याचा आनंद आहे. हे सगळं करताना असंख्य अडचणी आल्या त्यावर मात करत माझा आत्मविश्वास वाढला.
प्रश्न - मुळात तुम्ही डॉक्टर. डॉक्टर आणि पेशंटचं नातं हे फार जवळचं असतं. तुम्ही सैन्यदलातील जवानाचं एखाद्या प्रसंगात मनोबल कशाप्रकारे वाढवलंत, त्याबाबतचा तुमचा अनुभव कसा होता?
उत्तर - मुळात जवान नोकरी करताना घरापासून बाहेर असतो. एकटा असतो. त्याला काहीही झालं तरी तो सहन करू शकतो. मात्र, त्याच्या घरातील व्यक्तीला जर काही झालं असेल त्याला तळमळ होते. त्यावेळी एक बालरोगतज्ञ म्हणून जेव्हा मुलांची काळजी घेत होते त्यांचे वडील तेथे नसले जरी त्यांना काळजी असेल तर फोनवर बोलणं करुन द्यायचे, विशेषत: मुलांची किडनी वगैरे फेल व्हायची, अशा कठीण परिस्थितीमध्ये तेव्हा वडील नसायचं ते जाणल्यामुळे एक सहानुभूती मनात तयार झाली. आपण त्यांचे प्रश्न सोडवायचे. आता टेलिमेडिसीन आली आहे. व्हॉट्सअॅप आलं आहे. मात्र, जेव्हा हे नव्हते तेव्हा मी पेशंटला माझ्या ऑफिसचा आणि माझ्या घरचा नंबर दिला होता. माझे मुलं म्हणायचे, जेवताना सुद्धा तुला पेशंटचे कॉल येतात. मात्र, मला नेहमी असं वाटायचं पेशंटला ते Emergency वाटत असेल. अशाप्रकारे सैन्यदलात एक डॉक्टर आणि सैनिक म्हणून काम करणं एक वेगळा अनुभव होता.
प्रश्न - तुम्ही आता तुमच्या मुलाचा उल्लेख केलात. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य कसं बॅलन्स्ड केलंत?
उत्तर - करिअर आणि होम यात आपल्याला एक समतोल साधावा लागतो. ते करताना महिला आणि पुरुषांना आता समतोल आहे. मात्र, मला त्यावेळी मुलं माझ्याकडे होती. आणि 36 वर्षांपैकी 24 वर्ष आमची बदली सोबत झाली नाही. मुलं वाढताना एकटी राहणं आणि मी बालरोगतज्ञ असल्यामुळे इथे वॉर्डमध्ये आजारी मुलं आणि घरी दोन मुलं. त्यावेळी मी प्राथमिकता देत काम करत होती. त्यावेळी मुलांच्या शाळेत Parents-Teacher Meeting असेल त्यावेळी मी काहीही करुन वेळ काढत होती. जेव्हा रुग्णालयात एखादं बाळ गंभीर असेल त्यावेळी घरी स्वयंपाक नसेल तर मुलांना सांगायचे की काही ऑर्डर करुन घ्या, मी आता रुग्णालयात जाणार आहे. पण त्यामुळे मुलं ही जबाबदारी फार लवकर घ्यायला लागले. दोघे आता स्वावलंबी आहेत. मुलाला छान स्वयंपाक करता येतो. आणि त्याची बायको आता खूश आहे. मुलगीही आता अमेरिकेत आहे. तिला आता कोणतीच मदत लागत नाही. कारण बालपणापासून स्वावलंबी होण्याचा अनुभव मिळाला.
प्रश्न - मॅम सैन्यदलातील तुमचा कोरोनाचा अनुभव कसा होता?
उत्तर - मला या अनुभवातून खूप काही शिकायला मिळालं. मला एक अभिमान आहे, गर्व आहे मला त्यावेळी इतकी मोठी जबाबदारी मिळाली. जनरल बिपिन रावत सीडीएस होते. आपल्या तिन्ही सैन्यदलांना जेव्हा पंतप्रधानांनी जेव्हा सांगितलं की Nation is at War - कारण कोरोनाचं संकट हे युद्धासारखंच होतं. तेव्हा आपली रुग्णालये, आरोग्यव्यवस्था Healthcare Systems एकत्र करता नाही आलं. आमच्याकडे आमची 120-125 रुग्णालये जी होती सगळी Military Hospitalsमधील बरीचशी बेड्स आम्ही सामान्यांसाठी उपलब्ध करुन दिली होती. त्याशिवाय सैन्यदलातील निवृत्त सैनिक हे सामान्यत: Ex. Servicemen Health Scheme कडून Empanelled Hospitalsकडे जातात. त्यावेळी हे रुग्णालये भरुन गेल्यामुळे ते सर्वजण Military Hospitals मध्ये आले. त्यामुळे आधीच आमचं Healthcare Scheme overburden होतं. त्यावेळेला आम्हाला सूचना देण्यात आली की, पाच 500-1000 बेडचे रुग्णालये एकामागे एक उभे केले. DRDO ने त्याची इमारत बांधून दिली. पण ते चालवण्यासाठी सैन्यदलातील वैद्यकीय (Army Medical Core) विभागाला सांगितले. त्यात लागणाऱ्या मनुष्यबळासाठी मेडिकलवाल्यांना पूर्ण Army, Navy, AirForceने मदत केली. मला सर्वांनी इतकं सहकार्य केलं. Battle Field Normal जवानाला एक शॉर्ट ट्रेनिंग करुन वार्डमध्ये घेतलं. सिगनल्स वाल्यांनी Communication मध्ये मदत केली. आर्मीसीचे डॉक्टर्स, डेन्टल्स डॉक्टर्स हेसुद्धा आम्ही आमच्या रुग्णालयात घेतले. असे करुन नियमावली तयार केली. ती जबाबदारी मला देण्यात आली आणि ती व्यवस्थित पार पाडली, खरं म्हणजे मला यातून खूप शिकायला मिळालं आणि माझा आत्मविश्वास वाढला.
प्रश्न - मॅम, तुमच्याकडे रोल मॉडेल म्हणून पाहिलं जातं. तुम्ही युवा पिढीला, महिलांना, तरुणांना काय संदेश द्याल?
उत्तर - मी सर्वांना संदेश देणार. सुरुवातीला एक म्हणजे एक ध्येय निश्चित केलं पाहिजे की आपल्याला काय करायचंय. त्याच्यात फक्त मी माझा विचार न करता, माझ्यामुळे त्याचा लोकांना काय फायदा होणार, कोणतंही छोटंसं काम करताना ते चांगलं केल्याने जो स्वत:ला आनंद मिळतो आणि जो लोकांना फायदा होतो, म्हणजे खोली जरी साफ करायची असली तरी मन लावून ते काम केलं, मलाच आनंद मिळतो. त्यामुळे काम कोणतंही छोटं-मोठं नसतं. आता एमयूएचएसमध्ये आहे, त्याआधी डीन होते. माझी एक पद्धत होती की एक ध्येय ठरवायचं. टीमवर्क फार गरजेची आहे. आपण एकटे काही करु शकत नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, Individuals Brilliance चा काही उपयोग नाही. Collective Competence चा आहे. यामुळे आपल्याला एक टीमवर्कने काम करता येतं. असं केल्याने सर्वजण उत्स्फूर्तपणे काम करतात. दुसरं काय होतं की आपल्यावरचा भार कमी होतो. जसं वरच्या पदावर जातो सर्वांना एकत्र कसं करतो/आणतो ते महत्त्वांचं आहे. दुसरं म्हणजे आपली संस्कृती, आपला परिवार, ही मंडळी आपल्याला खूप मदत करु शकते. आपल्याला असं वाटतं की आता याच्यापुढे काय करणार असा विचार आल्यावर आपण आपल्या माणसांबरोबर आपले प्रश्न शेअर करावेत.
आजकालची युवापिढी फक्त व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर असतात. त्यांना मी सांगेन की, बोला. सगळ्याबरोबर संबंध ठेवा. त्यात तुम्हालाही आनंद मिळेल. सर्वांना आनंद मिळेल. गरजेच्या वेळेला फक्त तुम्हाला त्याची गरज नाही पडणार. तसेच आपल्याला अगदी परफेक्ट व्हायची गरज नाहीये. सर्वांना डॉक्टरच बना, इंजिनिअरच बना असं नाही. आपली आवड पाहून जर आपण प्रोफेशन निवडलं. तर आपण त्यात यशस्वी होतो, त्यात आपल्याला आनंदही जास्त मिळतो. अशा गोष्टी आहेत. मात्र, बेसिक म्हणजे Hardwork, Sincerity, Discipline यानुसार गेलात तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळतंच.
प्रश्न - मॅम, विद्यापीठासाठी काही Vision Document ठेवलंय का?
उत्तर - हो. मी नाही तर आमचा Vision Document आहे. माझी याठिकाणी नियुक्ती झाली. रुजू व्हायला वेळ होता. यादरम्यान, आम्ही संवाद सुरू केले. झुम मिटिंग्स केल्या. मी नेहमी म्हणते की, शिक्षण असो, संशोधन असो कुठे आपले गॅप्स आहेत ते आपल्याला ओळखावे लागलात. आम्ही सर्वांनी बसून चर्चा केली. माझ्या आधीचे कुलगुरुंनी चांगलं काम केलं. कोरोना काळात या विद्यापीठाने दीड लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा व्यवस्थित आणि वेळेवर घेतल्या. निकाल लावले. हे सोप्प नाहीये. ही क्षमता त्यांच्यात आहे. तर आता याच्यापुढे काय करुया कशात समस्या आहेत, कशात त्रास आहे असं आम्ही सगळे Quality of Education वर भार द्यायचा, Automation आणायचं, Post Graduation Education वाढवायचं, Meaningful Courses वाढवायचे, Basic Infrastructure in the Campus सुधारायचं, Research and Regional Centres यांना पुढे कसं न्यायचं, हे विद्यापीठाचं Vision Document आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपले विचार मांडले आहेत. यात आता आम्ही यात Deliverables in Time Frame असे मांडलेले आहेत. पुढच्या तीन-चार वर्षात हे आम्ही करू, असं आम्ही मांडलंय. यासाठी काय करावं लागेल, कुणी करावं हे सर्व आम्ही मांडलेलं आहे.