नाशिक - ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते अरुण ठाकूर (वय ६७) यांचे शुक्रवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. ते मुत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते. उपचारादरम्यान त्यांचे नाशिक येथे निधन झाले. अरुण ठाकूर यांचा नाशिकमधील सामाजवादी चळवळ आणि आंदोलनात मोलाचा सहभाग होता. तसेच ठाकूर हे आनंद निकेतन या प्रयोगशील शाळेचे संस्थापक होते.
ठाकूर यांच्या निधनाने शहरातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांनी देहदानाचा निर्णय आधीच घेतला असल्याने त्यांचे पार्थीव वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात येणार आहे.
अरुण ठाकूर यांनी मराठी शाळांच्या चळवळीसाठी अविरत प्रयत्न केले होते. तसेच त्यांचे नरक सफाईची गोष्ट, टिचर हे अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यामध्येही ठाकूर अग्रेसर होते. शासकीय आणि निमशासकीय मराठी माध्यमाच्यां शाळांच्या लढ्यात ते सहभागी होते.