ETV Bharat / state

Unseasonal Rain : अवकाळीचा 2 हजार 600 हेक्टर पिकांना फटका; गहू,कांदा, द्राक्षाचे मोठे नुकसान - द्राक्षे पिके भुईसपाट

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे हरभरा, गहू, द्राक्षे पिके भुईसपाट झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली आहे.

Unseasonal Rain
Unseasonal Rain
author img

By

Published : Mar 8, 2023, 6:04 PM IST

अवकाळीचा गहू, कांदा, द्राक्षाला फटका

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत पडलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अवकाळीने तब्बल 2 हजार 600 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी एकीकडे पिकांचे पडलेले दर तर दुसरीकडे अस्मानी संकट अशा दुहेरी कात्रीत जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे. महाराष्ट्रात अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मागील दोन ते तीन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील निफाड, देवळा, मनमाड, बागलाण, त्र्यंबक आदी भागातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, द्राक्ष गहू, हरभरा अशा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

190 गावं बाधित : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कापणीला आलेला हरभरा, गहू हे रब्बी पिके भुईसपाट होऊन पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील दोन दिवसात 190 गावे बाधित झालेले आहेत.

सर्वाधिक नुकसान निफाड तालुक्यात : अवकाळी पावसात सर्वाधिक 1 हजार 803 हेक्टवरील गव्हाचे नुकसान झाले आहे. त्यापैकी 1 हजार 745 हेक्टर क्षेत्र एकट्या निफाड तालुक्यातील, तर पाठोपाठ 58.30 हेक्टर क्षेत्र नाशिक तालुक्यातील आहे.

आर्थिक मदत मिळावी : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतींचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. त्याचप्रमाणे कोणीही आपत्तीग्रस्त शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून आर्थिक मदत मिळण्याची मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली आहे. गुजरात सारख्या राज्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्यावर 350 कोटी रुपयांची मदत घोषित केली. महाराष्ट्रात तर सर्वाधिक कांदा उप्तादक शेतकरी असतांना अद्याप महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत का नाही असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला.

हेही वाचा - Baba Ramdev Holi Of Flowers : बाबा रामदेवांनी शिष्यांसह खेळली फुलांची होळी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.