नाशिक - येवला तालुक्यातील राजापूर येथे कुठलीही परवानगी नसताना चौफुलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. काल मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी हे कार्य केले होते. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांशी समन्वय साधून पुतळा तेथून हलवला आणि आपल्या ताब्यात घेतला.
रस्त्याच्या कडेला लोखंडी चबुतऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला. आज सकाळी ग्रामस्थांना हा प्रकार निदर्शनास येताच खळबळ उडाली. मुळात येथे पुतळा बसवण्यासंदर्भात कुठलीही चर्चा किंवा नियोजन नव्हते. मात्र, अचानक पुतळा बसवण्यात आल्याने सर्वच चकीत झाले..
याबाबत सकाळी माहिती कळताच तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधीक्षक समीरसिंग साळवे व तहसीलदार प्रमोद हिले यांनीही राजापूर गाठले. अधिकाऱ्यांनी नागरिकांशी चर्चा केल्यानंतर पुतळा चौफुलीतून हलवण्यात आला. सध्या हा पुतळा येवला तहसील कार्यालयात आहे.
हेही वाचा - आयुक्त दीपक पांडेय यांची ग्रीन ज्युस संकल्पना उपयुक्त - छगन भुजबळ