ETV Bharat / state

Father Try to Kill Daughter : देहरेवाडी जंगलात मुलीला फासावर लटकवण्याचा प्रयत्न, बापास अटक

author img

By

Published : Jan 8, 2022, 4:42 PM IST

Updated : Jan 8, 2022, 8:34 PM IST

मुलीच्या हत्येचा संशय आपल्यावर येऊ नये म्हणून जन्मदात्या बापानेच मुलीला जंगलात नेत फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न ( Father Try to Kill Daughter ) केला. मात्र, पोलिसांनी अवघ्या 24 तासांतच तक्रारदार असलेल्या बापालासचआरोपी म्हणून अटक केले.

दिंडोरी पोलीस ठाणे
दिंडोरी पोलीस ठाणे

दिंडोरी (नाशिक) - मुलीच्या हत्येचा संशय आपल्यावर येऊ नये म्हणून जन्मदात्या बापानेच मुलीला जंगलात नेत फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न ( Father Try to Kill Daughter ) केला. मात्र, पोलिसांनी अवघ्या 24 तासांतच तक्रारदार असलेल्या बापालाच आरोपी म्हणून अटक केले.

माहिती देताना पोलीस अधीक्षक

मुलीची सावत्र आई घर सोडून गेल्याने बापानेच केला खूनाचा प्रयत्न

दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी येथील जंगलात ( Dehrewadi Forest ) लहानग्या मुलीला फाशी देत मारण्याचा प्रयत्न ( Father Try to Kill Daughter ) शुक्रवारी (दि. 7 जानेवारी) करण्यात आला. मात्र, एका गुराख्याच्या प्रसंगावधानाने त्या मुलीचा जीव वाचला. त्यानंतर पोलिसांनी आपली तपास चक्रे फिरवत मुलीच्या बापालाच अटक केली आहे. मुलीमुळे मुलीची सावत्र आई घर सोडून गेली म्हणून बापाने तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात अनेक पुरावे हाती लागल्याची माहिती जिल्हा पाेलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.

गुराख्याच्या प्रसंगावधानाने वाचले मुलीचे प्राण

राम महादू धनगरे (रा. मुंगसरा, ता.जि. नाशिक), असे त्या संशयित बापाचे नाव आहे. दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी-राशेगाव जवळील जंगलात दहा वर्षाच्या चिमुकलीला फासावर लटकावून ठार मारण्याच्या प्रयत्न ( Attempt to Hanging a Child Girl ) केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली हाेती. येथील गुराखी नारायण गांगुर्डे हे जनावरे चारत असताना जंगलात काही तरी आवाज व झटापट होत असल्याची त्यांना जाणीव झाली. जंगली जनावरे असावे, असा अंदाज करुन त्या दिशेने पाहणी केली असता एक व्यक्ती लहान मुलीला फासावर लटकवत असल्याचे दिसून आले. कोणीतरी येत असल्याचे लक्षात येताच त्या व्यक्तीने त्या ठिकाणाहून पळ काढला होता. त्यानंतर मुलीला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दिंडाेरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ ( Dindori Police ) व पथकाने घटनास्थळी पाहणी करुन तपास सुरू केला. त्यात अनेक खळबळजनक बाबी समाेर आल्या.

बापानेच दिली होती अपहरण करुन हत्येच्या प्रयत्नाची तक्रार

संशयित राम धनगरे याला पहिल्या पत्नीपासून ही मुलगी झाली असून तिच्याशी पटत नसल्याने ती पती व मुलांना साेडून गेली. त्यानंतर राम धनगरेने दुसऱ्या महिलेशी विवाह केला. कालांतराने पीडित मुलगी व तिच्या याच सावत्र आईशी पटेनासे झाले. सावत्र आई मुलीला मारहाण करत. त्यातून कुटुंबात भांडण हाेत असे. बुधवारी सावत्र आई व मुलीत भांडण झाल्याने सावत्र आईसुद्धा घरातून निघून गेली. दुसऱ्या दिवशी पीडित मुलगी शाळेत गेली असता तिच्या बापाने मुलीला खाेट बाेलून पूर्वनियाेजित कट रचून देहेरेवाडी जंगलात नेले. घरातून आणलेल्या दाेरीने तिला झाडावर लटकवून गळफास लावला. मात्र, नशीब बलवत्तर म्हणूण तिच्या ओरडण्याच्या आवाजाने गुरे चारणारे गुराखी तेथे आले. कुणीतरी येत असल्याची चाहूल लागताच संशयित बाप धनगरे पळून गेला. पीडित मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून आपल्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आणि माहिती देणारा हा बापच आपल्या मुलीच्या जीवावर उठल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांना 'असा' आला मुलीच्या बापावरच संशय

पोलिसांनी ( Nashik Crime News ) नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मुलीला उपचारासाठी दाखल केले. कुटुंबियांना बोलावून मुलची ओळख पटली. राम धनगरे याच्या तक्रारीवरुन अज्ञाताविरोधात गुन्हाही दाखल झाला. मुलीकडे चौकशी केली असता ती रडू लागली. पण, बोलत नव्हती म्हणून जवळचाच कोणीतरी आरोपी असणार, असा पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ( Nashik Police ) मुलीच्या खाणा-खुणावरुन मुलीच्या बापावरच पोलिसांचा संशय बळावला.

दोरीचा तुकडा आढळला घरात

याबाबत पोलिसांची पोलीस अधीक्षकांना ( Nashik SP ) माहिती दिली. पोलीस अधीक्षकांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत स्वतः याचा तपास केला. त्यानंतर गळफास दिलेल्या ठिकाणी आढलेली नायलॉनच्या दोरीचा काही भाग घरात आढळला. या एका आधारावर आरोपी घरातीलच आहे, या निष्कर्षावर पोलीस आले. त्यानंतर पोलिसांनी तक्रारदार बापालाच बेड्या ठोकल्या. या कटात आणखी सहभागी होते याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - No lockdown: जिल्हाधिकारी म्हणतात, लाॅकडाऊन झालेला नाही, अफवा पसरवू नका

Last Updated : Jan 8, 2022, 8:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.