ETV Bharat / state

येवल्यातील तरुण शेतकऱ्याने बनवले अंतर्गत मशागतीचे अनोखे यंत्र - येवला शेती वृत्त

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील अनिल भोरकडे या तरुण शेतकऱ्याने कापूस, मका, सोयाबीन यामध्ये अंतरमशागतीसाठी लागणारे तांत्रिक यंत्र घरीच तयार केले आहे.

nashik farming
येवल्यातील तरुण शेतकऱ्याने बनवले अंतर्गत मशागतीचे अनोखे यंत्र
author img

By

Published : Jul 18, 2020, 2:16 PM IST

Updated : Jul 18, 2020, 2:24 PM IST

नाशिक - येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील अनिल भोरकडे या तरुण शेतकऱ्याने कापूस, मका, सोयाबीन यामध्ये अंतरमशागतीसाठी लागणारे तांत्रिक यंत्र घरीच तयार केले आहे. यासाठी त्यांना भावाची साथ मिळाली आहे. या पॉवर टिलर मीनी ट्रॅक्टर यंत्राद्वारे फवारणी, पेरणी, कोळपणी, खुरपणी अशी शेतीतील अंतर्गत कामे करता येणार आहे. त्यामुळे खर्चात बचत व उत्पादनात वाढ होणार असून कामाचा वेळ देखील वाचणार आहे.

शेती क्षेत्रात होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने कला गुणांचा वापर करत या शेतकऱ्यांनी यंत्र बनवले. निसर्गाचा ढासळलेला समतोल पाहता शेती व्यावसाय अत्यंत डबघाईला आलेला आहे. तरीही पारंपारिक शेती व्यवसायाला सुधारीत तंत्रज्ञानाची जोड देऊन ग्रामीण भागातला शेतकरी आजही कसत आहे. शेती व्यवसायात अपेक्षित पैसा मिळत नसल्याामुळे नवतरुण नोकरी, व्यवसायासाठी शहराचा रस्ता धरताना दिसतो. खरिपात आपल्याकडे प्रामुख्याने मका, बाजरी, कापूस व सोयाबीन पीकं घेतली जातात. त्यांची खुरपणी मजुरांअभावी घरीच करावी लागते. तसेच अंतरमशागतीसाठी बैलांची गरज भासते. अनिल भोरकडे यांचेकडे बैलजोडी नसल्याने त्यांनी ही कल्पना अंमलात आणली.

आत्ताच्या परिस्थितीत चांगल्या बैलजोडीला ६० ते ७० हजार रुपये लागतात. त्यापेक्षा हा मार्ग सोपा आहे.

येवल्यातील तरुण शेतकऱ्याने बनवले अंतर्गत मशागतीचे अनोखे यंत्र

टाकाऊ पासून टिकाऊ

घरातील जुनं पिटर इंजिनचा वापर या मशिनमध्ये केला आहे. त्यासाठी लागणारी सामग्री येवला आणि कोपरगांव या ठिकाणांवरून जमा करण्यात आली आहे. अखेर २-३ महिन्यांत मशिन तयार झाले. यानंतर स्वतच्या शेतात प्रत्यक्षिक करण्यात आलं; आणि ते यशस्वी झालं.

यासाठी आई, भाऊ आणि परिवाराची साथ मिळाल्याचे त्यांनी अनिल यांनी सांगितले. यासाठी त्यांना २८ ते ३० हजार खर्च आला आहे. लहान शेतकऱ्यांनी असाच नवनवीन यंत्रांचा वापर करावा. शेतीमध्ये बचत हाच मंत्र असून उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयोगशील असावे, असे त्यांनी सांगितले.

Last Updated : Jul 18, 2020, 2:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.