नाशिक - मुथूट फायनान्स दरोडाप्रकरणी नाशिकच्या गुन्हे अन्वेषण शाखेने उत्तर प्रदेशातून दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली, मात्र याप्रकरणी चौकशी सुरू असून अद्याप कुठलीही माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली नाही, ताब्यात घेतलेले संशयित मुथूट फायनान्स गोळीबार प्रकरणातील असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
काही दिवसांपुर्वी नाशिक मुथूट फायनान्समध्ये अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश करत लुटमारीचा प्रयत्न केला होता. या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या घटनेत एक कर्मचारी जागीच ठार झाला होता, तर तीन जण जखमी झाले होते. काही वेळातच मोटार सायकलवरून आलेले दरोडेखोर शहराबाहेर पळून जाण्याचा यशस्वी झाले.
दोन दिवसांपुर्वी पेठ रोड रस्त्यावरील रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी आरोपीचा मोटार सायकल बेवारस अवस्थेत पोलिसांना मिळून आल्या होत्या, मात्र तपासानंतर या बनावट नंबर प्लेट मोटर सायकल असल्याचे समोर आले होते. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पोलीसाच्या गुन्हे शाखा युनिट २ ने मध्यप्रदेशमधून पप्या आणि जितेंद्र सिंग या दोघांना ताब्यात घेतले. हे दोन्ही संशयित मुथूट फायनान्स येथे झालेल्या गोळीबारातील आहे की, इतर गुन्ह्यातील आहेत याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही, मात्र लवकरच पोलीस प्रशासन याबाबत माहिती देईल असे सांगण्यात येते आहे.