ETV Bharat / state

येवल्यात हिंदू कुटुंबांतील दोघी बहिणींनी केले रमजानचे रोजे - हिंदू कुटुंबांतील बहिणींनी केले रमजानचे रोजे

येवल्यात हिंदू कुटुंबांतील दोघी बहिणींनी रमजानचे रोजे केले. यामुळे दोघी बहिणींनींचे कौतुक करण्यात येत आहे.

Two sisters from a Hindu family in Yeola fasted ramajaan
येवल्यात हिंदू कुटुंबांतील दोघी बहिणींनी केले रमजानचे रोजे
author img

By

Published : May 12, 2021, 8:06 PM IST

येवला - येवला शहरातील मुस्लीमबहुल भागात राहणाऱ्या वैष्णवी अहिरे व प्रांजल अहिरे या दोन्ही बहिणींनी रमजानचे रोजे केल्याने या दोघी बहिणींचे मुस्लीम समाजाकडून कौतुक करण्यात येत आहे.

येवल्यात हिंदू कुटुंबांतील दोघी बहिणींनी केले रमजानचे रोजे

बहिणींनी घडवले सामजिक एकोप्याचे दर्शन -

मजहब नही सिखाता आपसमे बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदोस्ता हमारा, हा मीर्जा गालीबचा शेर आज या दोन्ही बहिणींनी येथे तंतोतंत फिट करून दाखवला आहे. रमजानचे रोजे करुन जणू असाच संदेश दिलाय येवल्यातील प्रांजल आणि वैष्णवी आहिरे या दोघी बहिणींनी.

मुलींनी सेहरीचा रोजा इफ्तारचा आनंद लुटला -

शेजारी रहाणाऱ्या शेख कुटुंबीयांनी देखील वैष्णव व प्रांजलला नवीन कपडे, फुलहार घालून स्वागत केले. या मुलींनी शेख कुटुंबीयासोबत सेहरीचा रोजा इफ्तारचा आनंदसुद्धा यावेळी लुटला. यावेळी नगरसेविका परविन शेख व सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी देखील या मुलींना शाबासकीची थाप दिली आहे. रोजा केल्याचा आपणासही आनंद होतोय असे दोन्ही बहीणी सांगतात. कोणी कितीही जाती धर्मात विष कालवण्याचा प्रयत्न केला तरी सामाजिक एकतेचे प्रतिक असणारे शेकडो परिवार या देशात जिवंत आहेत हेच यावरुन सिद्ध होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.